Category: बातमी

  • त्याला चुना कसा लावतात हेसुद्धा माहीत नाही, वेळ आल्यावर मी त्याला चुना लावणार

    मंडळी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला नेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला होता. ज्यामध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटीलसुद्धा सामील आहे.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    गुलाबराव पाटलांसारख्या निष्ठावान शिवसैनिकाने पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांच्यावर बोचरी टीका करत

    ” गुलाबराव पाटील यांना पान टपरीवरून मंत्री केलं”

    अस विधान केल होत. मात्र गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये आमदारांच्या चर्चेदरम्यान गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना चांगलच धारेवर धरलं आहे. संजय राऊत यांना सुनावत गुलाबराव पाटील म्हणाले की,

    ” जेवढा संघर्ष आम्ही शिवसेनेसाठी केला आहे, तेवढा संजय राऊत यांनी केला आहे का? १९९२ साली झालेल्या शिवसेनेच्या एका आंदोलनात मी आणि माझे ३ भाऊ माझ्या वडिलांसोबत कितीतरी दिवस कारागृहात होतो हे तरी त्यांना माहिती आहे काय? ४७ डिग्री तापमान असतांना जळगावमध्ये मेळावा घेऊन ज्याप्रमाणे आम्ही ३५ जोडप्यांचे विवाह केले तशी हिम्मत संजय राऊत करतील का? आंदोलन करत असताना किती तरी किलोमीटरचा पायदळ प्रवास मी केला आहे तेव्हा संजय राऊत कुठे होते? अर्ध्या रात्री कार्यकर्त्यांचे फोन येतात म्हणून जसे आम्ही तयार असतो तसे राऊत राहतात का? शिवसेना घडवण्यात ऐंशी टक्के वाटा जरी बाळासाहेब ठाकरेंचा असला तरी २० टक्के वाटा हा आमचा आहे. आमच्याविरोधात आमची प्रेतयात्रा काढून निदर्शने केली जात आहे. मात्र जनता आमच्या पाठीशी आहे.”

    अस म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना चांगलच सुनावलं आहे. 

    शिवसेना संपणार ??

    त्याला मी चुना लावणार- गुलाबराव पाटील

    गुवाहाटीतील हॉटेलमध्ये स्थित बंडखोर आमदारांशी चर्चा करत असताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका करताना म्हटलं की,

    ” संजय राऊत यांना पानाला चुना तरी लावता येतो का? मात्र काही वेळ आल्यानंतर संजय राऊत यांना मी चुना लावल्याशिवाय राहणार नाही”

    असा टोला गुलाबराव पाटीलांनी राऊतांवर लगावला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • उदय सामंत गेले की पाठवले

    मंडळी शिवसेनेमध्ये मोठं नाव असलेले आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेल्या बंडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

    एकनाथ शिंदेंसोबत जवळपास शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला गेलेले आहे. मात्र पाठोपाठ शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा शिंदे गटात काल सामील झाले आहे.

    कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    उदय सामंत यांच्या शिंदे गटात सामील होण्याने जनतेचा राजकीय नेत्यांवरून विश्वास उडाल्याची भूमिका अनेक लोकांनी समाज माध्यमांवरून मांडली आहे. कारण एक ते दोन दिवसांपूर्वी शिवसेना भवनात पार पडलेल्या कार्यकारणी बैठकीला सामंत हजर होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते थेट गुवाहाटीचा रस्ता गाठून शिंदे गटात सामील झाले.

    यावर अनेक शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र उदय सामंत हे खरच स्वतावरून शिंदे गटात सामील झाले की उध्दव ठाकरेंच्या माध्यमातून पाठवल्या गेले. या संशयावरून उदभवलेल्या अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे.

    असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…

    नुकत्याच मुंबईमधील अनेक ठिकाणी पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना नेत्यांवर बोचरी टीका केली.

    मात्र उदय सामंत यांच्यावर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एकही टिकेच विधान निघाल नाही. यावरून सामंत यांना उध्दव ठाकरे यांनी शिंदेकडे स्वतावरून पाठवलं असण्याचा कल जनतेकडून वर्तवल्या जात आहे. 

    एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे किती आमदार हे स्वइच्छेने गेले आहे? किती आमदार हे दबावाखाली गेले आहे? आणि किती आमदार हे पाठवल्या गेले आहे? यावर सद्ध्या महाराष्ट्रातील जनतेला संशय आहे. येत्या काळामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल. यासाठी संपूर्ण लोकांची उत्कंठा वाढलेली आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    मंडळी काल रात्रीपर्यंत कार्यकर्ते ज्या नेत्याच्या नावाचे बॅनर आणि भोंगे लावत होते, अचानक सकाळी माहिती पडलं माननीय नेते महोदयांनी चक्क पक्षच बदलला आहे. तेव्हा त्या नेत्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, वेळप्रसंगी आपल्या नेत्यासाठी गावगाड्यात वाद घालून पक्षाची भूमिका मांडणारा कार्यकर्ता आपल्या मित्र मंडळींना काय उत्तर देईल?

    किंवा ज्या नेत्यासाठी त्याने वाद घातले त्या नेत्यानेच पक्ष बदलल्यानंतर तो विरोधकांशी, समाजातील जनतेशी नजर तरी मिळवू शकेल का? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं अगोदर रात्रभऱ्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्यांना विचारण्याची गरज आहे.

    जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

    कार्यकर्त्यांची कौटुंबिक परिस्थिती नसतांनासुद्धा आपला नेता निवडून आल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी काही तरी विकास करेल या उमेदीने नेत्यामागे आपली महत्वाची काम सोडून जात असतो. एखादा मोर्चा असला की संपूर्ण जबाबदारी कार्यकर्त्यांवर असते.

    मोर्चा, आंदोलने अशा चवळींमध्ये नेत्यांची मूल दिसत नाहीत. ते फक्त जेव्हा निवडणूका येईल तेव्हा उमेदवारी अर्ज भरायला आणि स्वतःचा प्रचार करायला दिसतात. मोर्चांमध्ये आपल्या नेत्यासाठी अंगावर केसेस घेणे, पोलिसांच्या लाठ्या खाणे अशा कित्येक संकटांना कार्यकर्ता तोंड देत असतो.

    दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    मात्र नेत्यांच्या मुलांवर कधीही केसेस लागत नाही. नेत्यांवर कधीही केसेस लागत नाही. कार्यकर्ता पक्षाचा झेंडा आणि दुपट्टा घेऊन गल्लोगल्ली प्रचारासाठी दिवसरात्र फिरतात. आपला नेता निवडून आला तर स्वतः निवडून आल्यासारख त्यांना वाटत. ते ही जाऊद्या जर कदाचित आपल्या नेत्याचा निवडणूकीमध्ये पराभव झाला तर सर्वात जास्त दुःख हे कार्यकर्त्याला होत. 

    साहेब नेत्यांनी पक्ष बदलल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अंगात ऑफिस फोडायला लावणार भूत घुसत नाही, खरतर त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होतो की, आपण ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्यानेच आपल्याशी विश्वास घात केला. कार्यकर्ता हा राजकिय नेत्यांसाठी खरा नेता असतो. म्हणून आपल्या स्वार्थापोटी पक्ष बदलून कार्यकर्त्यांची मनं दुखवू नका.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

    मंडळी ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि प्रत्येक शिवसैनिकाच प्रेरणास्थान असणारे आनंद दिघे यांच्या मृत्यूवर अजूनही जनता संशयित आहे.

    आनंद दिघेंचा वाढता प्रभाव आणि चाहता वर्ग वाढत असताना अचानक त्यांचा वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी मृत्यू होणे ही बाब खरतर काही शिवसैनिकांना न पटण्यासारखी होती. आनंद दिघे यांचा मृत्यू २६ ऑगस्ट २००१ ला ठाण्यामधल्या सुनितादेवी सिंघाणिया रुग्णालयात झाला.

    दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जोरदार दंगल उसळली होती. हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ठाण्यामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. कुणी म्हणत होत दिघेंची हत्या झाली तर कुणी म्हणत होत रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला.

    याच कारणावरून रागाच्या भरात दिघेंना ज्या रुग्णालयात ठेवल होत ते रुग्णालय शिवसैनिकांनी जाळून टाकलं. मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूआधी घडलेल्या घटनेवरून त्यांचा मृत्यू होणं हे न समजण्यासारखं होत. रुग्णालयात दाखल होण्याआधी म्हणजेच २४ ऑगस्ट २००१ ला दिघेंचा एका कार अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता.

    आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

    ज्यामुळे त्यांना ठाण्यातील सुनीता देवी सिंघाणिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २६ ऑगस्ट २००१ ला त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि संध्याकाळच्या सुमारास दिघे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

    त्यानंतर लगेच १० मिनिटांच्या अंतरात दुसरा झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अस त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र ठाण्यातील शिवसैनिकांचा दिघेंच्या अचानक झालेल्या मृत्यूवर विश्वास नव्हता.

    ज्यामुळे शिवसैनिकांना राग अनावर झाला आणि अवघ्या ३ तासात सिंघाणिया रुग्णालयाच रूपांतर एका खंडरमध्ये झालं. शिवसैनिकांनी २०० खाटांच संपूर्ण हॉस्पिटल जाळून टाकलं. हॉस्पिटलमधील नर्स आणि डॉक्टरांना आधी बाहेर काढण्यात आलं होतं. 

    दोन निर्दोष जीवांचा मृत्यू 

    आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर जाळण्यात आलेल्या हॉस्पिटलमधल्या नर्स आणि डॉक्टरांना जरी अगोदर बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र एका मासिकानुसार हॉस्पिटल जाळल्याने त्या ठिकाणची सगळी इलेक्ट्रिसिटी बंद पडली होती.

    ज्यामुळे सर्व व्हेंटिलेटर बंद पडले आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका ६ महिन्याच्या व ६६ वर्ष वय असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • १५ हजार कार्यकर्त्यांसह हार्दिक पटेल आज करणार भाजपात प्रवेश

    मंडळी राजकारण म्हटलं नेता केव्हा पलटून जाईल याचा कुणी अंदाजच लावू शकत नाही. मात्र यामध्ये भरडली जाते ती फक्त सर्वसामान्य जनता. गेल्या काही कालावधींमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांमध्ये चांगलच अपयश आलं.

    काँग्रेस पक्षाची ही पडती बाजू बघून पक्षातील काही नेत्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला आणि दुसऱ्या पक्षात सामील झाले. मात्र आता काँग्रेसला सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे हार्दिक पटेल यांच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयामुळे.

    जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर…

    हार्दिक पटेल यांनी गुजरातच्या प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याचं जाहीर रित्या सांगितलं आहे. हार्दिक पटेल हे स्वतः पाटीदार समाजातून असल्याकारणाने त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात पाटीदार समाज उभा आहे.

    गुजरातमधल्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला याचा चांगलाच फायदा होणार आहे. हार्दिक पटेल हे आज गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये आपल्या जवळपास १५ हजार कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हार्दिक पटेल यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे. 

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    काय म्हणाले हार्दिक पटेल ?

    युवानेते हार्दीक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची माहिती  ट्विटरवरून दिली आहे.

    ते म्हणाले की,

    ” राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि समाजहित या भावनेतून मी आज नवा अध्याय सुरू करतो आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात हे छोटा सैनिक म्हणून काम करेल.”

    अस हार्दिक पटेल यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना १०० कोटी द्यावे लागणारच – किरीट सोमय्या

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय नेत्यांकडून सुडाच आणि धार्मिक राजकारण होत आहे. जनतेच्या कुठल्याच प्रश्नाबद्दल एकही पक्ष बोलायला तयार नाही. एकमेकांवर ईडीची चौकशी लावणे, एकमेकांविरोधात केस करून कोर्टात जाणे.

    बस यावरच सध्याच राजकारण सुरू आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या आणि शिवसेनेच्या संजय राऊत आणि मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात पेटलेला वाद. शिवसेना कार्यकर्त्यांनी जेव्हापासून किरीट सोमय्या यांना मारहाण केली तेव्हापासून हा वाद चांगलाच चिघळवून आला आहे.

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    अलीकडे आधी महाविकास आघाडी सरकारन किरीट सोमय्या यांच्यावर ईडीची चौकशी पाठवली आणि नंतर भाजपची सत्ता असलेल्या केंद्र सरकारन संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी पाठवली.

    किरीट सोमय्या यांना १७२ कम्पन्यांनी पैसे दिले – संजय राऊत

    संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर सतत टीका टिप्पणी केल्याने किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात कोर्टामध्ये मानहानीचा दावा टाकला आहे. येणाऱ्या २६ मेला सुप्रीम कोर्टामध्ये याचा निकाल लागणार आहे.

    या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की,

    ” संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांनी मला मोठ्या प्रमाणात त्रास दिला आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. येणाऱ्या २६ मेला या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. माझ्याबाजूने निकाल लागला तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना मानहानीच्या दाव्यानुसार १०० कोटी रुपये भरावे लागतील.”

    अस किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं. 

    पुढे बोलतांना सोमय्या म्हणाले की,

    ” मानहानीच्या दाव्यानुसार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून वसूल केलेले १०० कोटी रुपये कुठल्याही धर्मशाखेला दान केले तरी चालेल. मात्र या दोघांवर सुप्रीम कोर्टाने मानहानीचा दावा सुप्रीम कोर्टाने मंजूर करावा.”

    अस किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ माजलाय तो म्हणजे भोंगा आणि अजाणवरून. सगळीकडे धार्मिक राजकारणाच वातावरण निर्माण झालेल आहे. मात्र आता वेळ आली आहे ती म्हणजे राज्यसभेच्या निवडणूकीची.

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न सध्या सम्पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. यासंदर्भात राजकीय क्षेत्रात जरा शिवसेनेची गुंतागुंतच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी सर्वात आधी नाव पुढे येत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजी राजे भोसले यांच.

    लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

    संभाजी राजे भोसले यांनी स्वतःच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र राज्यसभेची निवडणूक पाहता शिवसेनेपुढे सर्वात पहिला चेहरा आला तो म्हणजे संभाजी राजे भोसले यांचा.

    मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजी राजे भोसलेंना शिवसेनेची दिलेली ऑफर त्यांनी नाकारली. अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. संभाजी राजे भोसले स्वतंत्र फॉर्म भरतील असा अंदाज सद्ध्या सगळीकडून लावल्या जात आहे. 

    सत्तापिपासु औरंगजेब

    शिवसेना राज्यसभेसाठी दोन उमेदवार लढवणार- संजय राऊत

    प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की,

    ” आम्ही संभाजी राजे भोसले यांच्याबद्दल सध्या काही मत व्यक्त करू शकत नाही. शिवसेनेला कुणाला सोबत घ्यायचं आहे. हे शिवसेना ठरवेल.”

    अस संजय राऊत यांनी यावेळी सांगितल. राज्यसभेच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये संभाजीराजे भोसलेंवर संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • लाल महालातील प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

    मंडळी या महाराष्ट्रात अनेक संघटना पक्ष वेगवेगळ्या घडामोडींमुळे चर्चेत येत असतात. मात्र संभाजी ब्रिगेड हा पक्ष नेहमी त्यांच्या रुबाबदार व ब्रिगेडी स्टाईलमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.

    कधी शिवरायांच्या अपमानाची पुस्तक प्रकाशित करणार भांडारकर असो, पुरंदरेच तोंड काळ करणे असो, गिरीश कुबेरला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याबद्दल धडा शिकवणे असो की मग महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याच्या हेतूने भाषण करणारे राज ठाकरे यांना चॅलेंज देणे असो.

    राज ठाकरेंची पुण्यामध्ये २२ मे ला सभा, अयोध्या दौरा रद्द

    संभाजी ब्रिगेड अशा अनेक प्रकरणात नेहमी चर्चेत आली आहे. सध्या पुण्यातील लालमहालामध्ये झालेल्या वादग्रस्त कृत्याला संभाजी ब्रिगेडने जोरदार विरोध केला आहे.

    शिवरायांच्या इतिहासाची जाण करून देणाऱ्या लाल महालामध्ये वैष्णवी पाटील, केदार अवचरे आणि कुलदीप बापट नावाची एक तरुणी आणि दोन तरुणांनी एका तमाशाचा गाण्यावर विडिओ काढल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह

    शिवरायांच्या पराक्रमाची जाणीव करून देणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची कृत्य होत असेल तर आम्ही त्याला विरोध करू. अस आव्हान संभाजी ब्रिगेडने केलं आहे. 

    गुन्हे दाखल झाल्यानंतर तरूणांनी मागितली माफी

    लाल महालामध्ये काढलेल्या विडिओबाबत तक्रार झाल्यानंतर वैष्णवी पाटील, केदार अवचार आणि कुलदीप बापट या तरूणांनी संभाजी ब्रिगेड आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली आहे. या देशामधल्या कुठल्याच महापुरुषांच्या ऐतिहासिक ठिकाणी असल्याप्रकारचे कृत्य होणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने घेणं हे काळाची गरज आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज ठाकरेंची पुण्यामध्ये २२ मे ला सभा, अयोध्या दौरा रद्द

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सद्धया राज ठाकरे यांच्या सभांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील सभेनंतर आता पुण्यामध्ये २२ मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

    आतापर्यंत झालेल्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत चांगलाच वाद संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला होता. ज्यामुळे राज ठाकरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.

    आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह

    त्यांनी आपल्या भाषणांमधून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला अस महाराष्ट्रातील जनतेच म्हणणं आहे. औरंगाबाद येथील सभेमध्ये राज ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या १६ अटींच उल्लंघन केल्याने राज ठाकरे आणि इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हासुदधा दाखल करण्यात आला होता.

    ज्यामध्ये मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी एका महिला पोलिसाला धक्का देऊन पळ काढला होता. मात्र आता होणारी सभा ही २२ मे ला पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच सभागृहात होणार असून जवळपास ५००० श्रोत्यांची संख्या या सभागृहात बसू शकेल अशाप्रकारच आयोजन करण्यात आलं आहे. 

    ब्रुजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंविरोधात “आण रे तो पीडित” ट्रेंड

    राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. यासाठी त्यांनी पुण्याच्या सभेचा कारण दिल आहे. मात्र राज ठाकरे यांनी हा दौरा पुण्याच्या सभेमुळे स्थगित केला की उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्याविरोधामुळे स्थगित केला. हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही जो राज ठाकरेंना अयोध्येला आणेल- ब्रुजभूषण सिंह

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.

    ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

    ब्रुजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंविरोधात “आण रे तो पीडित” ट्रेंड

    मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिली आहे.

    ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,

    ” महाराष्ट्रातील लोकांशी आमच कुठल्याही प्रकारच वैर नाही. जर कुणी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये आला आणि त्याला हॉटेलमध्ये जागा मिळाली नाही, तर आम्ही त्याला आमच्या घरी राहू देऊ. मात्र राज ठाकरेंना कधीच नाही आणि त्यांना अयोध्येत आणणारा आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही.”

    अस म्हणत ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना विरोध केला आहे. 

    जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे

    एकीकडे यूपीच सरकार राज ठाकरेंचं स्वागत करीत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेच खासदार ब्रुजभूषण सिंह त्यांचा विरोध करत आहे. मात्र चिघळलेलं हे प्रकरण कुठल्या वळणावर जाईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir