Category: राजकीय व्यक्ती

  • मी हिमालयात जायचं म्हटलंच नव्हतं – चंद्रकांत पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकाणात एकीकडे राज ठाकरे यांनी धार्मिक मुद्दे उचलून ट्विस्ट आणला आहे, तर दुसरीकडे कोल्हापूरमधल्या पोटनिवडणुकीत झालेल्या भाजपाच्या प्रभावाने दुसरा ट्विस्ट चांगलच राजकीय वर्तुळ गाजवतोय.

    कोल्हापूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे सत्यजित कदम यांचा पराभव काँग्रेस पक्षाच्या नेत्या जयश्री जाधव यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षातील राजकीय वातावरण चांगलच डगमगलय. चंद्रकांत पाटील यांचा गड असलेलं कोल्हापूर काँग्रेस उमेदवार असलेल्या जयश्री जाधव नावाच्या स्त्रीन चांगलच अचंबित करून सोडलंय.

    या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठी उसंडी मारेल अशी शक्यता चहुबाजूंनी वर्तवल्या जात होती. मात्र भारतीय जनता पक्षाच धोरण हे कोल्हापूरमधल्या जनतेला बहुतेक भावलं नसाव. परिणामी त्यांनी काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना भाजपाच्या सत्यजित कदम यांच्याआधी पसंत केलं.

    मात्र भारतीय जनता पक्षाच्या या पराभवाच खापर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर फोडल्या जात आहे. कारण कोल्हापूर त्यांचा गड आहे आणि हे निवडणूक जिंकली नाही तर आपण राजकीय संन्यास घेऊन हिमालयात जाणार असल्याचसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

    मात्र आता पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी स्वभावाप्रमाणे आपण केलेलं वक्तव्य फिरवण्याच काम केलं आहे. 

    पराभवानंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

    कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत जर पराभव झाला तर राजकारणामधून संन्यास घेऊन हिमालयात निघून जाईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी चक्क आपलं विधान फिरवलं आहे. त्यांनी आपल्या विधानाला दांडी मारत प्रसार माध्यमांना सांगितलं की,

    ” पराभव झाल्यानंतर मी स्वतः हिमालयात जाईल अस म्हटलं नव्हतं. कदाचित मी निवडणूक लढलो असतो आणि माझा पराभव झाला असता, तेव्हा मी हिमालयात गेलो असतो.”

    अस चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं. मात्र चंद्रकांत पाटील यांचा दुतोंडेपणा आता महाराष्ट्रातील जनतेच्या चांगलाच लक्षात आला असावा. म्हणून भाजपाला कोल्हापूरमध्ये पराभव पत्करावा लागला.

  • देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारण सध्या हे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी उतावीळ झालंय अस म्हणायला काही हरकत नाही. यामध्ये सर्वात आधी नंबर लागतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा.

    मुंबई आणि ठाणेमध्ये घेण्यात आलेल्या त्यांच्या सभांमध्ये शिक्षण , शेती, रोजगार या मुद्द्यांव्यतिरिक्त हनुमान चालीसा , अजाण, हिंदू- मुस्लिम हेच मुद्दे ऐकायला मिळाले. त्यामुळे समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकांना एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होणे साहजिकच आहे.

    राज ठाकरे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र त्यांना राजकीय यश अजूनपर्यंत प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी आता धार्मिक राजकारणाचा सहारा घेतलेला आहे. जे लोकांचे मतं घेण्यासाठी सर्वात उपयुक्त साधन आहे.

    राज ठाकरेंच्या या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय मनसुब्याला आता आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी पाठिंबा दिला आहे. धार्मिक राजकारण खेळून आपण सहज मतं घेऊ शकतो. हे प्रत्येक राजकीय नेत्याला चांगलच माहिती आहे. म्हणून राज ठाकरेंच्या या चालू असलेल्या राजकीय खेळामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनीसुद्धा सहभाग घेतला आहे.

    आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याची ग्वाही दिल्यानंतर अमरावतीमधील शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या घरापुढे आंदोलन केलं. यावर आता नवनीत राणा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. 

    काय म्हणाल्या नवनीत राणा ? 

    शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा यांच्या घरापुढे आंदोलन करतांना पती रवी राणा आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर नवनीत राणा यांनी शिवसेनेला चांगलच प्रतिउत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की,

    ” शिवसैनिकांच माझ्या घरापुढे येऊन आंदोलन करणे ठीक नाही आहे. त्यांनी माझ्याविरोधात मुरदाबादचे नारे लावले. पण धर्म माझ्यासाठी आधी आहे आणि धर्मासाठी जर मला मुरदाबाद म्हटल्या जात असेल, तर मी मुरदाबाद आहे.”

    पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,

    ” उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे. बाळासाहेबांचे विचार आता त्यांच्यात राहलेले नाही. बाळासाहेब ठाकरेंनी केव्हाच कुठल्या पदाची लालसा केली नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी पदासाठी त्यांचे विचार सोडले आहेत. राज ठाकरेंमध्येच बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार दिसून येतात. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर राज ठाकरेंची गरज आहे. आम्ही कुठल्यापण परिस्थितीमध्ये मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार. शिवसैनिकांनी जरी पाय तोडण्याची गोष्ट केली असली तरी आम्ही देवाचं नामस्मरण करत येणार.”

    अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

  • सार्वकालिक आंबेडकर

    मंडळी या जगामध्ये जगत असतांना काही माणसं असे जगून जातात की समाजामधल्या प्रत्येक माणसाला वाटावं की, जगाव तर अस. असच एक उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मात्र या भारतीय देशाचं दुर्भाग्य अस की या महामानवाला आपण फक्त दलित समाजापर्यंत मर्यादित ठेवलं.

    त्यांनी राज्यघटना लिहिली आणि बौद्ध धम्म स्वीकारून त्यांनी दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला बस एवढंच आपल्याला माहिती आहे. मात्र या समाजमधल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसासाठी झटणारे बाबासाहेब आपल्याला कळलेच नाही.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कामगार नेते होते. स्त्रियांना हिंदू कोडबीलाच्या माध्यमातून पुरुषांइतकाच समान हक्क बहाल करणारे नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. हे कधी आपण वाचलेच नाही. 

    शेतकरी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    मंडळी जेव्हा या देशामध्ये ब्रिटिश सरकारच राज्य होत. तेव्हा त्यांचं म्हणणं होत की, या देशातल्या शेतजमिना ह्या इंग्रज सरकारच्या आहे. त्यावर भारतीय शेतकरी ताबा घेऊन बसलेला आहे. म्हणून इंग्रज सरकार शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करणे, ठराविक कालावधीनंतर तो शेतसारा वाढवणे. अशा अनेक माध्यमातून शेतकऱ्यांच शोषण इंग्रज सरकार करत होत.

    मात्र हे धोरण डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हत. शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे. परिस्थितीने ग्रासलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तो शेतसारा कसा भरेल? शेतकऱ्यांच्या अशा अनेक व्यथा डॉ. आंबेडकरांनी 1८ ऑगस्ट १९२५ रोजी ‘ तरुण भारत ‘ या वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखात मांडल्या आहेत. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी झटणारे महापुरुष म्हणजे डॉ. आंबेडकर आहेत. 

    कामगार नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    मंडळी जेव्हा ब्रिटिशांच राज्य या देशामध्ये होत तेव्हा त्यांनी नवीन उद्योगधंदे सुरू केले. ज्यामुळे स्थानिक जनतेच्या हातामधला रोजगार गेला. उद्योगधंदे बंद पडले. म्हणून ब्रिटिशांकडे काम करत असताना भारतीय मजूरांचे खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सरकार शोषण करत होत.

    हवा तेवढा वेळ काम करून घेणे. सुट्टी न देणे. पगार कापणे किंवा वेळेवर न देणे. अशा अनेक कठीण संघर्षातून कामगार चालला होता. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महापुरुष भारतीय कामगारांसाठी उभा झाला.

    कामगाराच जीवन अनुभवायसाठी डॉ. आंबेडकर बॅरिस्टर असून कोण्या मोठ्या बंगल्यात न राहता कामगार वस्तीमध्ये रहायचे. नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळी उभारून इथल्या प्रत्येक कामगाराला कामाचे तास ठरवून दिले. सुट्टीचा दिवस ठरवून दिला. वेतन योग्य मिळावे यासाठी तरतूद केली.

    महिलांनासुद्धा पुरुषांसोबत समान वेतन मिळेल याची तरतूद केली. प्रत्येक स्त्रीला प्रसूतीच्या आधी १० आठवडे आणि प्रसूतीच्या नंतर ४ आठवडे सुट्टी घेण्याची तरतूद केली आणि गुलाम, शोषित झालेला इथला मजूर मजबूत करण्याचं कामसुद्धा डॉ. आंबेडकर यांनी केलं. 

    मंडळी अशी अनेक महान कार्य डॉ. आंबेडकर यांनी इथली प्रत्येक समाजासाठी केली आहे.

  • कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट आणण्यासाठी
    चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टोलेबाजी

    मंडळी सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत चिघळत चाललं आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार म्हणजे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध सद्धया महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

    कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची डबल ढोलकी असते, अस ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर बोलताना कोल्हापूर निवडणूकीच्या अनुषंगाने खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.

    ते म्हणाले,

    “तुम्ही कोल्हापूर शहरात आला तर विकास निधी वाढेल. त्याचा गावांच्या विकासासाठी फायदा होईल. अस आम्ही गेल्या पाच वर्षात इथल्या गावांना सांगितलं परंतु या गावांनी ऐकलं नाही.”

    अस ते म्हणाले. 

    चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले की,

    ” जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी असते. जिल्हा परिषदेची निवडणूक आली शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्दवाढीची मागणी करतात.”

    अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मात्र आता यावर महाविकास आघाडीमधील नेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे केलेल्या भाषणामध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावायला सांगितल्याने महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून जनतेची मतं काबीज करण्यासाठी राज ठाकरेंचा हा खटाटोप पाहून सम्पूर्ण महाराष्ट्रात त्यांची टीका केली जात आहे.

    राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भोंगे लावलेले आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कृत्यातून महाराष्ट्राची सामाजीक तेढ निर्माण होण्याची धोका नाकारता येत नाही. मात्र या सर्व गोष्टींचा काही एक विचार न करता राज साहेब आपल्या मतावर ठाम आहे.

    राजसाहेबांच्या या कृत्याचा विरोध संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीमध्ये झालेल्या एका सभेमध्ये राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 

    काय म्हणाले अजित पवार? 

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचलेल्या हनुमान चाळीसाच्या वादावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीमध्ये बोलत असताना त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते म्हणाले की,

    “काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे कामं करतात. कित्येक वर्ष लोक एकमेकांना गुण्यागोविंदाने साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते अस करा इथं हा भोंगा लावा तिथं तो भोंगा लावा सांगत आहेत. अरे भाषण करणं सोपं आहेरे बाबा. पण त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगू लागले आहेत. कोणाला तरी बर वाटण्यासाठी , निवडणूकीवर डोळा ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषण हे फुले शाहू आंबेकरांच्या विचारांच्या लोकांना पटणारी नाहीत. चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहे काय?”

    असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली.

  • भाजप देशात विषारी वातावरण पसरवत आहे- शरद पवार

    मंडळी कश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटामुळे संपूर्ण देशामध्ये वादावादीच वातावरण निर्माण झालं आहे. याचच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद.

    शरद पवारांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी द्यायची गरज नव्हती असही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

    “काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आधार घेत भाजपा जनतेमध्ये चुकीचा गैरसमज पसरवत असून संपूर्ण देशात विषारी वातावरण पसरवण्याच काम करत आहे.”

    असा आरोप शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर केला आहे. याआधीसुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी या चित्रपटाला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारवर टीका केली होती.

    महाराष्ट्रातील विविध संघटना, संस्था आणि विविध प्रकारच्या समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी भाजपवर टीका केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा त्यांना प्रतिउत्तर दिल आहे. 

    काय म्हणाले फडणवीस ?

    मंडळी कश्मीर फाईल्स या चित्रपटाचार आधार घेऊन केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये विषारी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. अस शरद पवार यांनी म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर प्रतिहल्ला करत उत्तर दिलं आहे.

    ते म्हणाले की,

    ” अलीकडच्या काळात राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल, काँग्रेस असेल यांच्यामध्ये अल्पसंख्यांक मत मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे त्यातून अशी वक्तव्य येतात.”

    अस फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा वाद आता कुठल्या वळणावर जातो यावर सर्वांचं लक्ष लागूंन आहे.

  • भाजपसोबत भविष्यात युती नाहीच- आदित्य ठाकरे

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये दिवसेंदिवस बराच ट्विस्ट येत आहे. त्याच कारण अस की, आता महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी हे लढाई वेगात चालू आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजप नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत, तर भाजप नेते महाविकास आघाडी नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत.

    मात्र आता कोकण दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आपली भाजपसंबंधी भविष्याच्या वाटचालीविषयी म्हटलं की,

    ” जो व्यक्ती आपल्यावर अन्याय करतो, आपल्याशी जबरदस्ती करतो आपण त्याच्याशी मैत्री करत नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाची भूमिका पण तेच आहे म्हणून भविष्यात त्यांच्याशी युती होणे शक्य नाही.”

    अस अदित्य ठाकरे यांनी विधान केले आहे. तर या संपूर्ण विधानावर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलच प्रतिउत्तर दिल आहे.

    काय म्हणाले दरेकर?

    मंडळी भाजप नेहमी अन्याय करत आली असल्याकारणाने त्यांच्यासोबत भविष्यात युती होणे शक्य नाही. अस विधान आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर भाजप नेते यांनीसुद्धा आदित्य ठाकरे यांना टोला देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    ते म्हणाले की,

    ” शिवसेनेन नेहमी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम केलं आहे. मग अशामध्ये भाजप शिवसेनेपुढे कधीच युतीचा प्रस्ताव ठेवूच शकत नाही.’

    अस प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा उद्धव ठाकरे नेहमी पाठीमध्ये खंजर खुपसत आली आहे. अस विधान केलं होत. मात्र प्रविण दरेकरांच्या या प्रतिक्रियेवर आता शिवसेना काय प्रतिउत्तर देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • पवारांवरच्या वादग्रस्त विधानावरून सदाभाऊ खोत यांना मिटकरींचा टोला

    मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांची खिल्ली उडवणे याला कुठलाही राजकीय नेता अपवाद नाही. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या ईडीच्या चौकशीचा धुमाकूळ चालू असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय क्षेत्रातआणखी एक ट्विस्ट आणला आहे.

    रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं असा सल्ला दिला आहे. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्या संबंधी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

    ते म्हणाले की,

    ” शरद पवार हे महान व्यक्ती आहे. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी आडनाव बदलून ते ‘आगलावे’ करावं.”

    अशी टीका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केली आहे. यावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आली असून अद्याप शरद पवारांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. 

    काय म्हणाले मिटकरी? 

    सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला अमोल मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले की,

    ” शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत. तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्यावर उडू शकते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वतः बोलत नाहीत. यामागे फडणवीसांचा मास्टरमाईंड आहे. अस माझं स्पष्ट मत आहे.”

    अस अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. मात्र आता सदाभाऊ खोत यांना शरद पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का? – माजी आमदार हर्षवर्धन पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील राजकीय घडामोडींनी सम्पूर्ण राज्यात सध्या धुमाकूळ घातला आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी मोफत घर देण्याच्या निर्णयाने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभरातून टीका केली जात आहे.
     
     
    आमदारांना मुंबईत मोफत घरे देण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घोषणेवरून ही घरे मोफत दिली जाणार नाही तर त्यासाठी ७० लाख रुपये मोजावे लागतील, अशी सारवासारव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील आमदारांना तसेच मुंबईत मालकीचे घर असणाऱ्यांना घरे दिली जाणार नाहीत.
     
     
    असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अस असलं तरी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली जात असतानाच यासंदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत का नाहीत? असा प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. आणखी बऱ्याच मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस गप्प असतात. अस सुद्धा ते म्हणाले. 
     
     
     काय म्हणाले हर्षवर्धन पाटील ?
     
     
    मंडळी महाराष्ट्र सरकारच्या विविध निर्णयामुळे जेव्हा सम्पूर्ण महाराष्ट्रभरातून टीका होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर कमालीची टीका करताना दिसत असतात. मात्र सर्वपक्षीय आमदारांना घरे वाटपाचा निर्णय असो की, एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा असो या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस का बोलत नाही?
     
     
    असा प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की,
     
     
    ” एसटीच्या कर्मचारी संपापासून तर आतपर्यंत चाललेल्या वेगवेगळ्या योजनांमध्ये ३० ते ४० टक्के कट लावण्यापर्यंत दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये या आमदार लोकांना घर देणं सरकारला कस काय परवडल? राज्यात प्रचंड आर्थिक संकट असतांना सरकार उधळपट्टी करतंय आणि आता देवेंद्र फडणवीस तोंडात बोळा घालून बसले आहेत.”
     
     
    असा प्रश्न माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
  • आमदारांना घर मोफत नाही – जितेंद्र आव्हाड

    मंडळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमार्फत केली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
     
     
    जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य वर्षानुवर्षे घर मिळावं यासाठी म्हाडाकडे अर्ज करत असताना आधीच इतके श्रीमंत असणाऱ्या आमदारांना मोफत घर कशासाठी? अशी विचारणा केली जात आहे.
     
     
    भाजपाच्या काही नेत्यांनीही या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले की,
     
     
    ” आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतांनाही चार कोटी केला. ड्रायव्हरचे साहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घर दिली जाणार आहेत. कशासाठी घर पाहिजेत? माझं मुंबईत घर नाही. तरीही हे पैसे तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना , शेतकऱ्यांना द्या. यासाठी मी आग्रही असेल.”
     
     
    अस ते म्हणाले. 
     
     

    जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण

     
     
    मंडळी जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घर वाटपाच्या निर्णयामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वातावरण हे चांगलच तापलं आहे. मात्र या सर्व प्रकरणावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता ट्विट करून स्पष्टीकरण दिल आहे.
     
     
           ते म्हणाले की,
     
     
    ‘आमदारांना घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत + बांधकाम खर्च ( अपेक्षित खर्च ७० लाख ) याची किंमत आकारण्यात येणार आहे.”
     
     
    अस त्यांनी ट्विट करून म्हटलंय. आता यावर विरोधी पक्षनेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.