Category: राजकीय व्यक्ती

  • जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर…

    मंडळी राजकरण म्हटलं की बहुधा आपण बघतो राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची फसवणूक करण्याचं काम करत असतात. एखाद्या कारवाईचा सर्वसामान्य गोरगरीब व्यक्ती शिकार होतो. मात्र तशाच प्रकारचा गुन्हा एखाद्या नेत्याच्या आप्तिकाने केला तर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.

    याहीव्यतिरिक्त एखाद्या चांगल्या ठिकाणी पात्र गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलून आपल्या परिचयातील व्यक्तीला नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हे तर राजकीय नेत्यांचे नित्याचेच झाले आहे.

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    मात्र या सर्व कृतींना अपवाद सोडला तर राजकीय नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण संपूर्ण जगासमोर ठेवणारा नेता म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कर्तव्यदक्ष नेते व केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीनजी गडकरी साहेब.

    जनतेकडून मतं लुटण्याच्या इर्षेने अनेक नेते धार्मिक मुद्दे उचलून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र नितीन गडकरी यांचा  समाजातील कुठलाच वर्ग टीकाकार नाही.

    आणि बाबरी पाडल्या गेली…

    याच कारण म्हणजे त्यांचा कर्तव्यदक्षपणा. मा. नितीन गडकरी नेहमी प्रसार माध्यमांशी किंवा भाषणामध्ये बोलत असताना विकास कामांचेच मुद्दे मांडत असतात. ‘आज तक ‘ या न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी असाच एक किस्सा सांगितला होता.

    नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यामध्ये एका रस्त्याच्या बांधणीच काम सुरू होत आणि रस्त्याशेजारील काही घरे ही अतिक्रमणमध्ये येत होती. ज्यामध्ये गडकरी साहेबांच्या सासरेबुवांचसुद्धा घर होत. तेव्हा त्यांनी अतिक्रमणमध्ये असलेल्या सासरेबुवांच्या घरासमवेत सर्व घरांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले होते.

    हे सर्व घडल्यानंतर गडकरी साहेबांच्या पत्नी आणि त्यांच्या परिवारातील सगळी लोकं त्यांच्यावर नाराज झाली होती. तेव्हा मा. गडकरी साहेबांनी “कायदा हा सर्वांसाठी समान असतो.” अस सांगत संपूर्ण देशासमोर उत्तम राजकीय नेत्याचं उदाहरण ठेवलं होतं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

    कारागृहात असतांना झाले आमदार

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

    मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांवर टीका टिप्पणी करणं हा राजकीय क्षेत्राचा एक अंग आहे. मात्र कुणाचा जीव घेणे किंवा त्याची हत्या करणे ही गोष्ट अतिशय क्रूरतेची ओळख करून देते. होय मंडळी. आज आपण बोलणार आहोत भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल.

    तारिख होती २२ एप्रिल २००६, वार शनिवार, सकाळचे जवळपास साडे सात वाजलेले होते. प्रमोद महाजन हे मुंबईमधील परळीतल्या आपल्या पूर्णा निवासस्थानी पेपर वाचताना चहा पीत होते. अचानक दाराची बेल वाजली.

    आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    प्रमोद महाजन यांनी दार उघडले आणि दारासमोर जीन्स आणि टीशर्ट घालून त्यांचे भाऊ प्रवीण महाजन उभे होते. प्रमोद महाजनांनी प्रवीण महाजनांना आत बोलावले. दोघांमध्ये फारसे पटत नव्हते.

    दोघेही बैठकीमध्ये चर्चा करत असताना प्रमोद महाजन यांच्या पत्नीला अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आला. प्रमोद महाजनांवर त्या गोळ्या अक्षरशः त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी झाडल्या होत्या.

    तेव्हा प्रमोद महाजन यांच्या पत्नी हा सगळा प्रकार बघून ठप्प झाल्या. त्यांनी प्रवीण महाजनांना म्हटलं की,

    ” प्रवीण हे काय केलंस तू?”

    यावर प्रवीण महाजन

    ” भोगा आता.”

    अस उत्तर देऊन बिल्डींगच्या खाली उतरले आणि आपली गाडी पार्कींगलाच ठेवून टॅक्सीने पोलीस स्टेशनकडे रवाना झाले. प्रमोद महाजन यांच्या बिल्डिंगमध्ये जेष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडेसुद्धा राहत होते.

    तेव्हा प्रमोद महाजन यांच्या पत्नीने गोपीनाथ मुंडे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना मुंबईमधल्या हिंदुज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं 

    १३ दिवस मृत्यूशी लढून झुंज अपयशी

    हिंदुज्या रुग्णालयात चालू असलेली प्रमोद महाजन यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि ३ मे २००६ रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे प्रवीण महाजन यांनी आपला गुन्हा कबूल केला होता.

    प्रवीण महाजन यांनी आपल्या MY ALBUM या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की,

    ” हे सगळं कोणी केलं ? कस घडलं ? हे कुणाला कधीच कळणार नाही. मात्र हत्येच्या दिवशी काय काय घडलं? हे आपल्याला कळू शकेल.”

    अस प्रमोद महाजन यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. मात्र प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली? हे आजपर्यंत कळू शकलं नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

    मंडळी भारतीय देशाच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय नेते झाले ज्यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणूक आली तेव्हा मतं घेण्यासाठी जनतेच्या दारोदारी गेले पण निवडणूक झाल्यानंतर त्याच जनतेच्या कठीण काळात निष्ठुरपणाने पाठ फिरवली.

     

     

    मात्र राजकारण वाईट नाही ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. याच संकल्पनेचा वसा घेऊन अनेक राजकीय नेते समाजामध्ये अहोरात्र जनतेच्या हितासाठी झटत असतात. याच उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्यातील पारनेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश ज्ञानदेव लंके.

     

    तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

     

    कोरोना काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळाली होती. तेव्हा खरतर आपलं कोण आणि परक कोण? हे दिसून आलं होतं. आपलेच आप्तिक आपल्याजवळ यायला तयार नव्हते. लोकांना आक्सिजन असो की बेडची उपलब्धता असो या सर्व गोष्टींच्या अभावामुळे लोक मुंग्यांसारखी मरण पावत होती.

     

    अशा काळामध्ये निलेश लंके नावाचा एक आमदार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कोरोना रुग्णांची जबाबदारी घेऊन ११०० बेड असलेलं कोविड सेंटर उभारतो. स्वतः तिथल्या कोरोना रुग्णांची सेवा करतो. तिथेच जेवणसुद्धा करतो. असा आमदाराच्या रूपाने एक आयुष्य वाचवणारा ईश्वर कोरोना रुग्णांनी कोरोना काळात बघितला होता.

     

    कारागृहात असतांना झाले आमदार

     

    आपल्या जीवाची कुठल्याही प्रकारची हमी न बाळगता निलेश लंके कोरोना बाधितांची सेवा करतानाचे विडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 

     

    कोण आहे निलेश लंके ?

     

    मंडळी निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे आमदार २०१९ चया विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहे. त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्राची सुरवात हे शिवसेनेतून केली होती. अवघ्या वयाच्या १५ व्या वर्षी ते शिवसेनेचे शाखा प्रमुख झाले होते. तिथून त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्राला सामाजिक कामांचा आकार दिला.

     

    निलेश लंके यांचे वडील हे शिक्षक आणि आई या गृहिणी होत्या. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने त्यांनी काही वेळ नोकरीसुद्धा केली. मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेले निलेश लंके हे जनतेच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांकडून राजकीय नेत्यांनी आदर्श घेण्यासारखं निलेश लंके यांचं व्यक्तिमत्त्व आहे.

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं

    मंडळी या जगाच्या राजकीय इतिहासामध्ये राजकारणात यशस्वी होण्यासाठी जनतेची फसवणूक करणारे, आपल्याच नातेवाईकांना अक्षरशः कुटुंबातून वेगळं करणारे, दारूचा वाटप करून गोरगरिबांची मत घेणारे असे अनेक राजकीय नेते आपण बघितले आहेत आणि अनुभवलेसुद्धा आहे.

    मात्र असा एक नेता ज्याची प्रकृती बिघडल्याची वार्ता कळल्यानंतर लोकांच्या डोळ्यातील आसवांना पारावर राहला नाही. अक्षरशः लोकांनी अभिषेक करायला सुरुवात केली. इतका जनतेच्या काळजात घर करून बसलेला नेता म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ नेते मा.श्री गणपतरावजी देशमुख उर्फ आपल्या सर्वांचे लाडके आबा.

    कारागृहात असतांना झाले आमदार

    गणपतराव देशमुख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावी १० ऑगस्ट १९२६ रोजी झाला. ते व्यवसायाने वकील होते. मात्र आपल्या सांगोला मतदारसंघातील परिस्थिती बघता त्यांनी प्रत्येक माणसाचा आवाज बनून १९६२ साली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते निवडूनसुद्धा आले.

    सांगोला मतदारसंघातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आबांनी अनेक आंदोलनेसुदधा केली. सतत ११ वेळा आमदार म्हणून निवडून येणारे आबा हे देशातील सर्वात पहिले आमदार होते.

    प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    आपल्या साध्या राहणीमानामुळे आबा नेहमीच चर्चेत असायचे. १९९०, २००४ व २००९ साली त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांना वोधनमंडळाचा जीवनगौरव पुरस्कार, वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब पाटील समाजभूषण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 

    सलग ११ वेळ निवडून आलेले आमदार असूनसुद्धा आबांनी नेहमी एसटीमधून प्रवास केला. अत्यंत साधी राहणी ठेवली. सांगोला मतदारसंघातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी अनेक आंदोलने केली. स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ राहून कधीही दुसऱ्या पक्षाचा विचार केला नाही.

    त्यांनी आपल्या वयाच्या ९५ व्या वर्षी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात ३० जुलै २०२१ ला अखेरचा श्वास घेतला. आबांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर पसरला होता. मा. गणपतराव देशमुख हे एकमेव राजकीय व्यक्तिमत्त्व अस होत की, ज्यांना विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    महाराष्ट्राने नुकताच प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयीचा त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या विचारांचा पाडलेला मुडदा पहिला. राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे नाव घेत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. हे सर्व आपण पाहत आहोत. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?

    या विषयावर मी मागच्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह करून त्यांचे पुस्तक दाखवून त्यातले उतारे वाचून दाखवले होते. बऱ्याच लोकांनी फोन करून त्यावर छोटेखानी लेख लिहिण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रबोधनकार ठाकरे नेमकं काय म्हणतात या विषयाचा थोडक्यात धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

    एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की शिवसेनेचा जन्म प्रबोधनकारांच्या तळपत्या लेखनातून झालेला आहे. बाळासाहेब सेनेचा ब्रँड झालेत मात्र संकल्पना प्रबोधनकारांच्या विचारातून जन्मली. नुकतीच प्रथमेश पाटलांच्या इंडी जर्नलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रसिद्ध पत्रकार व मुलाखतकार राजू परुळेकर यांनी प्रबोधनकार ठाकरेंनी उभा केलेला बहुजनवादी हिंदुत्ववाद बाळासाहेब ठाकरे यांनी कसा मोडला,

    त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे भाजपाच्या व संघाच्या हिंदुत्ववादाच्या मागे लागून बाळासाहेब ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंनी वाढवलेली बहुजनवादी हिंदू पिढी कशी नासवली यावर सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यामुळे जाणकारांनी ती मुलाखत मुळातून पहावी.

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी ?

    प्रबोधनकार ठाकरे आपल्या पुस्तकातून व आपल्या लेखनातून व्यक्त होताना अत्यंत टोकदार व धारदार लिहायचे. ते हिंदुत्ववादी होते का तर नक्कीच हिंदुत्ववादी होते पण त्यांचा हिंदुत्ववाद शेंडी-जानव्याचा –  ब्राह्मणांचा –  भटांचा – दगडाला देव मानणाऱ्याचा नव्हता तर हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांना आपल्या लेखणीने फाट्यावर मारत त्यांनी ईश्वराच्या व हिंदू मानवाच्या मध्ये असलेल्या दलाल भट ब्राह्मणांना दूर ठेवून समस्त हिंदू समाजाला शोषणविरहित  वातावरण देण्याचा होता.

    अजुन एक समजून घेतले पाहिजे की त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार मिशनरी स्वरूपाचा व्हावा असही लिखाण केलेले आहे मात्र त्याचे अधिकार त्यांनी भट ब्राह्मणांना देण्याचे नाकारले आहे. चला पाहूया प्रबोधनकार काय म्हणतात..

    सध्या मुस्लिम धर्माबाबत विविध प्रकारची वाद रोजच येत असतात, ‘हिंदू धर्माचे दिव्य’ या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे पान नंबर 6 वर म्हणतात,

    “आजचे हिंदुस्थानातील मुसलमान म्हणणारे आमचे देशबांधव हे पूर्वाश्रमीचे आमचे हिंदू बंधू होत. साष्टी प्रांतातल्या ख्रिस्ती बांधवांप्रमाणे हे आमचे सारे हिंदी मुसलमान पूर्वीचे अस्सल हिंदूच असल्यामुळे हिंदुस्तान आपला मायदेश आहे, हा अभिमान बाळगण्याचा त्यांना हिंदू इतका अधिकार आहे. हे अधिक विशद करून सांगणे नको.”

    पुढे अजून पान नंबर 43 वरती ते म्हणतात,

    “पूर्वी मुसलमानांनी हिंदूंचा छळ केला त्याचीच पुनरावृत्ती हिंदू पेशव्यांनी आपल्याच धर्म बांधवावर करून आपल्या नावाला अक्षय काळोखी लावून ठेवली. पेशवाई झाली हीच मोठी चूक झाली, असे जे मुमुक्षकर्ते पांगारकर व इतर निस्पृह इतिहासकार म्हणतात ते सर्व दृष्टींनी विचार केल्यास वाजवी नाही असे कोण म्हणेल ?”

    राज ठाकरेंनी टिळकांचा उदोउदो करतांना हा उतारा वाचला नसणार. वाचला असता तर ते टिळकांना घेऊन मिरले नसते.  टिळकांची हिंदू-मुस्लीम वाद लावण्यात काय भूमिका होती याचा परखड समाचार त्यांनी घेतलेला आहे.

    प्रबोधनकार ‘संस्कृतीचा संग्राम’ मध्ये म्हणतात,

    ” जात्याच अत्यंत महत्वकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृती साधर्माचे भान राहिले नाही आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारीच्या हातवाऱ्याने त्यांनी हिंदू-मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या…..महाराष्ट्रातील मुसलमान हे हिंदूर्यवन: असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यात व हिंदुत कसलाही भेद नाही. त्यांची राहणी,आचार -विचार, उदरभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वी हिंदूंप्रमाणेच एकजिनसी आहेत. कारण ते जात्या मूळचे हिंदूच. पूर्वजांवर झालेल्या धर्मांतराच्या बळजबरी मुळेच ते आमच्या रक्तमासाचे आप्त संबंधी असून सुद्धा आज निव्वळ नावाला आमच्यापासून पारखे झाल्यासारखे दिसतात इतकेच….. महाराष्ट्रात तर सर्रास शुद्ध हिंदू मुशीचा मुसलमानच आढळून येतो. संस्कृतीसाम्याचा फायदा घेऊन व्यापक मिशनरी धोरणाने येथल्या मुसलमानांना कै.टिळकांनी जर आपल्याकडे ओढण्याची खटपट केली असती तर आज निदान महाराष्ट्रात तरी हा प्रश्न पुष्कळच सुटला असता खास. ‘पण ज्यांचे सर्व राजकारण मुळी जातिभेदाच्या आणि स्वजातिवर्चस्वाच्या मसाल्यांचे तेथे मुसलमानांना पुसतो कोण ? ” 

    भट – भिक्षुकशाही- ब्राह्मणांबद्दल प्रबोधनकारांची मते तर प्रचंड जहाल होती. प्रबोधनकार देवळांचा धर्म व धर्माची देवळे मध्ये म्हणतात,

    ” आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या कावळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनियेतला माणूस, माणूस असून पशूपेक्षाही पशू बनला आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या हलाखीचे मूळ भटांच्या पोटात आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठात नव्हे….. मनुस्मृती पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा, जाळून खाक करा की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच. प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही….. देवाच्या मूर्ती साठी आणि देवळांच्या किर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल तर त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल. म्हणे ब्राह्मणानी धर्म जागविला ! ….. कोणाच्याही मनोभावाची पर्वा न करता कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की, हे देवळे नसून सैतान खाने आहेत.” 

    याच विषयी पुढे  ‘ खरा ब्राह्मण ‘ या पुस्तिकेत प्रबोधनकार ठाकरे यांची एक लावणी आहे त्यात ते म्हणतात,

    ब्रह्मदेवाचा बाप भट बनला जी !

    झाली धर्माची पातळ भाजी !!

    चार वर्णाच्या चार कोटी जाती !

    क्षत्र वैश्यांची केली चिकनमाती !

    शूद्र दुनियेचा बामन गाजी हो !!

     देव राहिला पल्याड  ! बामण राजा अल्याड !

     त्याचं लागलं लिगाड !  जो तो भीतो,

     भटा करतो जी जी !!

     झाली धर्माची पातळ भाजी !!!

    आमदार चरण वाघमारे यांची भाजपमधून हकालपट्टी

    शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बाबतीत झालेल्या वादावर ‘ ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’  या पुस्तकात प्रबोधनकार म्हणतात,

    ” स्वराज्याचा पाया शिवाजीसारख्या महापुरुषाच्या हातून ठाकठीक बसल्यावर हिंदू धर्माचा ही पाया पुनश्च ठाकठीक बसवून धर्म व राजकारण यांची अभेद्य जोडी एकत्र करण्याचा विचार निघाला आणि त्याचे पर्यावसन शिवाजी महाराजांना शास्त्रोक्त राज्याभिषेक करावा या बेतात झाले. हा राज्याभिषेकाचा प्रश्न त्या काळच्या परिस्थितीचा विचार करता इतका महत्त्वाचा व अत्यावश्यक होता की त्याला विरोध करण्याची नुसती कल्पना करणारी मस्तकं महाराजांनी जरी तात्काळ छाटून टाकले असते तरी अफजलखानाच्या वधा इतकेच महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य केले असते असा इतिहासकारांचा शेरा खात्रीने पडला असता. परंतु शेवटी त्या महत्त्वाच्या कार्यात भटच पडला ! (आडवा आला )…… ब्राह्मणांनी व पिंगळ्यासारख्या स्वामीनिष्ठ ब्राह्मण मुत्सद्द्यांनीसुद्धा राज्याभिषेकाची कल्पना समूळ हाणून पाडण्यासाठी कास मारली. परंतु महाराष्ट्राचे भाग्य म्हणून म्हणा किंवा त्याला  स्वतंत्र राज्यस्थापनेचा ऐतिहासिक सुखसोहळा याच जन्मी याची डोळा पहायचा होता म्हणून म्हणा तत्कालीन ब्राह्मणांच्या दुराभिमानाला चित करायला अखेर एक क्षत्रिय वीरच पुढे सरसावला.”

    प्रबोधनकार ठाकरेंच्या जहाल विचारांचे असे अनेक दाखले देता येतील. मला तर वाटते जे जे राजकीय लोक प्रबोधनकार ठाकरेंचे नाव घेत आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकांचे जाहीर वाचन ठेवावे.

    महाराष्ट्र शासनाने, त्यात योगायोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत त्यांनी प्रबोधनकारांची पुस्तके माफक किमतीत उपलब्ध करून द्यावीत. त्यात महत्त्वाचे म्हणजे देवळांचा धर्म व धर्माची देवळे व खरा ब्राम्हण ही पुस्तके मोफत वाटप करायची व्यवस्था लावावी.

    पण प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने राजकारण करणाऱ्या, ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ना हिंदू जननायकचा खोटा मुखवटा घालून फिरणाऱ्या राज ठाकरे यांच्यात हिम्मत आहे की प्रबोधनकारांचे साहित्य जाहीरपणे वाचून दाखवतील किंवा प्रसारित करतील. त्यामुळे लोकांनी आत्ता सजग असलं पाहिजे. तूर्तास इतकेच..

    जय जिजाऊ..

    संदर्भ – 

    १) प्रबोधनकार ठाकरे समग्र वांग्मय,खंड –  चौथा-  हिंदुत्व, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    २) प्रबोधनकार ठाकरे समग्र वांग्मय,खंड – पाचवा, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    ३) देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे,

    प्रकाशक –  लोकायत पुणे

    ४) खरा ब्राह्मण- संपादक, गंगाधर बनबरे

    ५) इंडी जर्नलच्या मुलाखतीची लिंक – https://youtu.be/Nr-ujrthKrk

    लेखक — पंकज मधुकर रणदिवे.

    वक्ता,लेखक,ब्लॉगर,प्रवक्ता

    वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य.

    9834993421,8600073161

    Mail id – [email protected]

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनीत राणा

    मंडळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल.

    शिवसेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वेस्थानकावर तैनात केले होते. मात्र राणा दाम्पत्य हे शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सरळ राणा दाम्पत्याच घर गाठलं.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    कालपासून राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्ते वेढा देऊन बसलेले आहेत. शेकडो पोलीससुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र आज राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाण्याकरीता बाहेर पडणार हे कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्व बॅरिगेट्स तोडून अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.

    यामध्ये पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झडप झाली. आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका केली. त्या म्हणाल्या की,

    ” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”

    अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 

    ‘द कश्मिरी फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा- आमदार नितेश राणे

    शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅरिगेट्स तोडले

    राणा दाम्पत्य आज हनुमान चालीसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाणार हे कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिगेट्स तोडून अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झडप झाली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलं आहे. मात्र चिघळलेलं हे प्रकरण आता कुठलं वळण घेणार यावर सर्वांच लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

    मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकरणात धार्मिक राजकारण खेळण्याचे राजकीय नेत्यांचे मनसुबे चालू आहेत. जनतेच्या प्रश्नांची पर्वा कुणालाच पडलेली नाही. मात्र कुठे हनुमान चालीसा वाजवायचा आणि कुठे अजाण यावर सध्याच राजकारण चालू आहे.

    राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत हनुमान चालीसाच्या वादावरून धार्मीक मुद्दा उचलून धरला होता. राजकीय क्षेत्रात पुरेस यश आलं नाही तर राजकीय नेते धार्मिक राजकारणाची मदत घेतात. हे राज ठाकरेंच्या बाबतीत बघायला मिळाल.

    राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    मात्र भारतीय जनता पक्षाची हरदम टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजपच्या धार्मिक राजकारणाच्या बाजूने गेले याच सर्वांना आश्चर्य वाटलं आणि आता तेच राज ठाकरेंनी साकारलेली भूमिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार नवनीत राणा यांनी साकारलेली आहे.

    राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्याच्या मुद्द्याला शिवसेनेनं कडाडून विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने राज ठाकरेंची बाजू घेत शिवसेनेला आव्हान केलं होत की, आम्ही मुंबईमध्ये मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू आणि आज राणा दाम्पत्य तेच आव्हान पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    प्रतिउत्तरात शिवसेनेनेसुद्धा राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून राणा दाम्पत्य गनिमी काव्याने नागपूर विमानतळावरून मुंबईत दाखल झाल आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना राणा दाम्पत्य म्हणाल की,

    ” मातोश्री हे आमच्या श्रद्धेच स्थान आहे. बाळासाहेब ठाकरें हे आमच्या हृदयात राहतात. मात्र त्यांचा विचार उद्धव ठाकरेंना जपता आलेला नाही.” पुढे पत्रकाराणे मुख्यमंत्र्यांना तुम्ही पनौती म्हणाल का? असा प्रश्न राणा दाम्पत्याला विचारल्यानंतर त्यांनी ” हो! १०० टक्के म्हणतो.”

    अस उत्तर दिलं. 

     मातोश्रीवर असणारे शिवसैनिक नाही – राणा दाम्पत्य

    आज दिलेल्या आव्हानानुसार राणा दाम्पत्य मुंबईत आलं असता, प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की,

    ” जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे ते ग्राउंड लेव्हलवर काम करतात. मात्र हे जे मातोश्रीवर मुरदाबादचे नारे लावत आहेत. हे शिवसैनिक नाही आहे.”

    असा टोला राणा दाम्पत्यांनी शिवसेनेवर लगावला. मात्र आता चिघळलेलं हे प्रकरण कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

    मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उपस्थित नेत्याने जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कडाडून टीका केली होती.

    परिणामी इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेच मेन टार्गेट हे राज ठाकरेच बनले. राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या भाषणातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जातीयवादी म्हणून ते कधीही छत्रपती शिवरायांच नाव घेत नाही असा आरोप केला होता.

    या पार्श्वभूमीवर काल इस्लामपूरमध्ये बोलतांना सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की,

    ” राज ठाकरे यांनी शरद पवार साहेबांना जातीयवादी म्हटलं. पण त्यांना मला सांगायचं आहे, की माझ्यापासून तर अमोल मिटकरींपर्यंत प्रत्येक माणसाला उच्च पदावर नेण्याचं काम हे शरद पवार यांनी केलं आहे. माझ्यासारखा एक भटक्या जातीमधला समाजातला एक सर्वसाधारण तरुण जो २०१४ च्या निवडणूकीत सबसेल पराभूत होतो. अशा पराभूत झालेल्या तरुणाला कुठलीही जात धर्म न बघता विधान परिषदेच वरीष्ठ सभागृहाच विरोधीपक्षनेते पद दिल जात. त्या शरद पवारांना राज ठाकरे जर जातीयवादी नेते म्हणत असतील, तर त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे.”

    अशाप्रकारची जहरी टीका धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. 

    राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव- धनंजय मुंडे 

    काल इस्लामपूरच्या सभेमध्ये टीका करत असताना धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंचा भाजपचा अर्धवट राव असा उल्लेख केला. ते म्हणाले की,

    ” मी लहान असताना शाळेमध्ये एक नाटक दाखवल्या जात होतं. ज्यामध्ये रामदास पाध्येच्या हातामध्ये एक बावल असायचं. त्याच नाव अर्धवट राव होत. जेव्हा रामदास पाध्ये जे बोलत नाही ते त्यांच्या हातामधल अर्धवटराव नावच बावल बोलायचं. मात्र ते सगळं बोलणं रामदास पाध्येंचच असायचं. तसेच भारतीय जनता पक्षाचे राज ठाकरे हे अर्धवट राव आहे आणि भाजपा ही रामदास पाध्ये आहे.”

    अस बोलतांना त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

  • मोहन भागवतांनी कश्मीरी पंडितांच पुनर्वसन करावं – प्रवीण तोगडिया ( अध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद )

    मंडळी सध्या भारतीय देशामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिमांचा वाद निर्माण करण्याचा चौफेर राजकारण काही संघटना आणि पक्षांकडून होत आहे. अलीकडे गाजलेला ‘ द कश्मीर फाईल्स हा चित्रपट चांगलच वादाच कारण बनला होता.

    संपूर्ण देशामध्ये या चित्रपटाने हिंदू मुस्लिम चर्चेचा डंका वाजवला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कश्मीरी पंडितांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र ती भूमिका फक्त हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करणारी होती.

    मोहन भागवंत यांच्या याच भूमिकेवरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,

    ” मोहन भागवत यांना जर अखंड भारत करायचा असेल तर, त्यांना मी आठवण देऊ इच्छितो की जेव्हा आपण सत्तेत नसतो तेव्हा आपल्याला वचनं द्यायचे असतात आणि जेव्हा सत्तेत असतो तेव्हा ते वचनं पूर्ण करायचे असतात. आता तुमचेच लोक सत्तेत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा वचन पूर्ण करायचं आहे. जे कश्मीरी पंडित गेल्या ७ वर्षांपासून पुनर्वसनासाठी हक्क मागत आहे. त्यांचं एका महिन्यामध्ये पुनर्वसन करून द्याव आणि किमान एक रात्र तरी आपण एखाद्या कश्मीरमधल्या गावामध्ये मुक्काम करून दाखवावा. हेच अखंड भारताचा पाहिलं पाऊल असेल.”

    असा टोला प्रवीण तोगडिया यांनी मोहन भागवत यांच्यावर लगावला. 

    तोगडियांचा भाजप आणि राज ठाकरेंनासुद्धा टोला

    आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भोंग्याच्या वादावरून आपलं मत व्यक्त करताना राज ठाकरे आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की,

    ” ज्या राज्यात भाजपाच सरकार आहे त्या राज्यात भोंगे उतरवण्याचे आदेश का बरं दिले जात नाही. जर तुम्हाला भोंगे उतरवायचे असेल तर ४८ तासांच्या आत भोंगे उतरवायचे असतील तर सुप्रीम कोर्टाकडून पोलीस प्रशासनाला आदेश द्यायला लावा. मी नाव घेणार नाही. पण हिंदूचा अचानक पुडका आलेल्या व्यक्तींच मी स्वागत करतो.”

    अस त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं.

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर

    मंडळी गेल्या कित्येक महिन्यांपासून महराष्ट्रामध्ये चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा वाद सुटता सुटत नाही आहे. अलीकडे शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरून संपूर्ण महाराष्ट्र खळबळून उठला होता.

    मात्र जवळपास १२० एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढता लढता आत्महत्या केली तेव्हा एवढा गदारोळ झाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणासाठी चालू असलेलं आंदोलन अध्यापही शांत झालेलं नाही.

    महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी उलट १०७ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच काम केलं. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी आता प्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 

    काय म्हणाले पडळकर? 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वादावरून जोरदार टीका केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,

    “पवारांच्या घरावर जो हल्ला झाला त्याच आम्ही समर्थन करत नाही.  मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला संपूर्णतः शरद पवार जबाबदार आहे. त्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला नाही, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र माझ्या गाडीवरती हल्ला होऊनसुद्धा माझ्यावरतीच गुन्हा दाखल केल्या गेला. परत एकदा माझ्या गाडीवरती दोनशे ते अडीचशे लोकांनी हल्ला केल्यानंतर माझ्यावरच ३०७ चा गुन्हा दाखल केल्या गेला. शरद पवार हे नेहमी दुटप्पी भूमिका घेत असतात. कर्मचारी पवारांच्या घराकडे का चालून आली याचा अभ्यास शरद पवार यांनी का केला नाही? ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याला जबाबदार पवार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. एसटी कर्मचाऱ्यांच ५० वर्ष समर्थन शरद पवारांनी केलं. विलीनिकरणाची आषासुद्धा त्यांनीच दाखवली. मग आता पवार पाठ का फिरवत आहे ?”

    असा चोख प्रश्न विचारत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. मात्र आता यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांच लक्ष लागून आहे.