Author: admin

  • नानांना लागले राजकारणाचे वेध?

    Nana Patekar In Politics

    साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है* हा डायलॉग ऐकला की, चाटदिशी एक चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, अर्थातच तो नाना पाटेकरांचा.

    क्रांतीवीर, तिरंगा, नटसम्राट अश्या अगणित चित्रपटाद्वारे उत्कृष्ठ अभिनयाची एक आदर्श रेषा नानांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये घालून दिली.

    मात्र गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर जरा वेगळ्याच कारणामुळे प्रसार माध्यमांचा केंद्रबिंदू बनलेले आहेत.

    मागच्या 10 दिवसात नानांनी दोन राजकीय विधाने केली.
    पहिलं विधान म्हणजे, “आगामी निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे, त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही”, आणि दुसरं विधान म्हणजे “राजकरणात सातत्य ठेवणारी माणसे कमी आहेत. त्यातही देवेंद्र फडणवीस हे म्हणजे मुद्देसुद बोलणारे व्यक्ती आहेत”.

    पहिलं केंद्रातल्या भाजप नेतृत्वासाठी आणि दुसरं महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वासाठी, नानांनी काढलेले हे कौतुकोद्गार आहे.

    आता ह्यावरून सर्वांनाच प्रश्न पडला असेल, की नानांनी ही वक्तव्य करण्यामागचं कारण नक्की काय?

    आता हा विषय जरा सुरुवाती पासून समजून घेऊ.
    ते असं आहे की, नाना पाटेकर अभिनेते असले तरी नानांची राजकीय जाणीव तशी भक्कम आहे. कारण त्यांची शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या सोबतची असलेली जवळीक आपल्या वडिलांच्या पिढीने बघितलेली आहे. अगदी नाना स्वतः सांगतात त्याप्रमाणे, “अरे गाढवा, कसा आहेस? असं म्हणतं बाळासाहेब नानांच्या गळ्यात हात घालुन जवळ ओढायचे”.

    बाळासाहेब दिवंगत झाल्या नंतर नानांची जवळीक पवार काका – पुतण्यांसोबत अगदीच वाढली. ती इतकी वाढली की, अजित पवारांच्या धरणाच्या वादग्रस्त विधानावरून, नाना जाहीर भाषणात कोपरखिळी मारून, दादांची मस्करी घेतात आणि अजित दादा देखील त्याला मनमोकळा हसून प्रतिसाद देतात. याचे व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेले असतीलच.

    अश्यातच नाना पाटेकर आता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ह्या जोडीचे कौतुक करता आहेत. ह्या वरून नानांचा राजकीय चाणाक्षपणा लक्षात येतो. तो असा की, बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंब, यांच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील राजकारण फिरत असल्याचे आपण बघितले आहे. तर सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे येत आहेत. अश्या ठराविक परिस्थीत, ठराविक नेत्यांच्या जवळ जाऊन आपले वयक्तिक हित साध्य करून घेण्याचा नानांचा कल असू शकतो, असे म्हणता येऊ शकते.

    मग प्रश्न असा निर्माण होतो की, अशा राजकीय चाणाक्षपानातून नाना कोणते हित साध्य करू शकता?

    तर आपण बघतो की, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटाला अधिक पसंती मिळत असते. अशा वेळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचा परिणाम त्या चित्रपटाच्या अर्थकारणावर होतो. मग आपले राजकीय संबंध जर भक्कम असतील तर थिएटर मिळण्यासाठी सोईचे होते, हा झाला एक फायदा.
    दुसरा फायदा म्हणजे, नाना पाटेकरांच्या “नाम फाउंडेशनचा”.
    नाम फाउंडेशन ही ग्रामीण भागात कार्य करणारी एक सामाजिक संस्था आहे. कोणतीही सामाजिक संस्था यशस्वीरित्या चालवण्यासाठी राजकीय हितसंबंध फायद्याचे ठरतात. संस्थेला येणाऱ्या आर्थिक अडचणी, स्थानिक कामात लागणारे राजकीय सहकार्य, परदेशातून मागवावी लागणारी मदत अशा अनेक कारणांमुळे राजकीय हितसंबंध उपयोगात येतात.

    तसेच तिसरे आणि सर्वात महत्वाचे हित म्हणजे नानांना लागलेले आमदारकीचे वेध. काही दिवसांपूर्वी भाजपाने सिनेसृष्टीतल्या माधुरी दिक्षित यांना लोकसभा आणि नाना पाटेकर यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रस्ताव दिला होता. आता ह्या प्रस्तावाचे पुढे काय झाले हे समजू शकलेले नाही.
    पण नानांनी खडकवासला मतदार संघामधून निवडणूक लढविण्याची ईच्छा अनेकदा अजित पवारांकडे खासगीत बोलताना व्यक्त केलेली आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. तसेच खडकवासला येथील घेरा सिंहगड भागात नाना पाटेकरांची शेती आणि फार्म हाऊस आहे. त्या निमित्ताने नाना आपला बराच फावला वेळ ह्या फार्म हाऊस वर घालवतात.

    आता ह्या दोन राजकीय विधनांमुळे नाना पाटेकर भाजपच्या किती जवळ जातील? आणि नानांचा राजकीय चाणाक्षपणा भाजपासमोर किती कारगर ठरेल? ह्या प्रश्नाचं उत्तर येणारी वेळच देईल. तथापि ह्या मुद्यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

  • महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री विनोद तावडे ?

    महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री विनोद तावडे ?

    मुख्यमंत्री विनोद तावडे?

    रविवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना, एका पत्रकाराने “पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवण्या बाबत” प्रश्न विचारला असता. त्यावर विनोद तावडे यांनी “तुम्ही मी मुख्यमंत्री होईल का?” असा प्रश्न का विचारात नाही? असे मिश्किल अंदाजात उच्चारले.

    पण खरचं विनोद तावडे मुख्यमंत्री होऊ शकतात का? तर हा प्रश्न तसा रास्तच आहे. कारण एक, विनोद तावडे हे मराठा चेहरा आहेत. ज्यामुळे भाजपाला राज्यातील मराठा समाजाला सोबत घेणे सोईचे जाईल. तसेच “ब्राम्हणवादाला पुढे रेटणारा पक्ष” ह्या टीकेला भाजप तावडेंच्या माध्यमातून खोडून काढू शकतो.

    दोन, उत्कृष्ठ संघटन कौशल्य आणि प्रभावी रणनीतीकार याच्या जोरावर, भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या महत्वाच्या पदाची जबाबदारी विनोद तावडे यांनी मिळवली. विशेष म्हणजे याआधी दिवंगत प्रमोद महाजन हे एकमेव नेते भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बसलेले होते. तावडेंचे कौशल्य पाहता, त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी – शहा यांचे दौरे ठरवण्याची आणि 2019 साली भाजपा ज्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होती, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तेथील उमेदवार निश्चित करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. एकूणच यानुसार मोदी – शहा यांचा तावडेंवर भक्कम विश्वास असल्याचे दिसते.

    तीन, स्वच्छ प्रतिमा असणारा नेता. सध्या महाराष्ट्र भाजपचे नेते कोणत्या न कोणत्या वादात अडकलेले दिसतात. मग बावनकुळेंचे कॅसिनो प्रकरण असेल, चंद्रकांत पाटलांवर वारंवार होणारी शाईफेक किंवा त्यांच्या दौऱ्यांना होणार विरोध असेल, किंवा देवेंद्र फडणवीसांवर शिवसेना-राष्ट्रवादी फोडल्याचे आरोप आणि 2019 च्या पाहटेच्या शपथविधिमुळे ओढवून घेतलेली वरिष्ठांची नाराजी असेल. पण त्याचवेळी ABVP पासून सुरुवात करणाऱ्या तावडेंचा प्रवास हा कायमचं चढता राहिलेला आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप विनोद तावडे यांच्यावर नसल्याने, भाजप हायकमांड तावडेंना पुढे करू शकते.

    चार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपल्या आधीच्या पक्ष्यात बंड करून सत्तेत बसल्याने, आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने त्यांच्या विरोधात मोठा मतप्रवाह आहे. तसेच नेहमी प्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणारी सत्ता विरोधी लहर. आणि महत्त्वाचे म्हणजे शिंदे – पवार समीकरण दीर्घकालीन चालणारे आणि टिकणारे नाही याची जाणीव भाजपाला चांगलीच आहे. म्हणून अशा ठिकाणी विनोद तावडे परफेक्ट बसताना दिसतात.

    पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ABVP द्वारे राजकारणाची सुरूवात करणारा, RSS च्या मुशीत तयार झालेला, पक्षासाठी अडचणीच्या काळात धावून येणारा विश्वासू अशी विनोद तावडे यांची ओळख.

    यांसारख्या कारणांमुळे विनोद तावडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात. पण विनोद तावडेंना 2018 साली मंत्री पदावरून बाजूला सारण्यात आले होते. तसेच 2019 साली पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते, हे देखील विसरून चालणार नाही. तसेच “देवेंद्र फडणवीस हे देखील मुत्सुद्दी, अभ्यासू आणि भविष्याचा वेध घेणारे नेते,” मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विनोद तावडेंसमोर असतील, यात कोणतीही शंका नाही.

    यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

  • “जन जन कि पुकार ठाकरे सरकार” नारा देत संपूर्ण महाराष्ट्रभरात सायकलने निष्ठा यात्रा काढणारा निहाल पांडे कोण आहे ?

    युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या माध्यमातून सामान्य, कष्टकरी, शेतकरी, अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेला सामाजिक चळवळीतील पुढाकार हा अनेकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरला.

    वर्धा शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी केलेले लाक्षणिक स्वच्छता आंदोलन सलग २ महिने १९ प्रभागात राबवून शहर स्वच्छ व सुंदर केले. वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे मिळावे यासाठी धरणे आंदोलन, अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले पण निष्ठुर सरकार पुढे जेव्हा प्रयत्न अपयशी ठरले तेव्हा मात्र वर्धा ते नागपूर सचिवालय पर्यंत ८३ किलोमीटरचा पायदळ प्रवास करून “भुदेव यात्रा” काढत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

    केंद्र सरकारला जाग करण्यासाठी “महादेव यात्रेच्या” माध्यमातून सायकलने सेवाग्राम ते दिल्ली प्रवास करून वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून दिला व हक्काचा घरपट्टा मिळवून दिला.

    सामान्य जनतेच्या हितार्थ वेळोवेळी कर्तव्यतत्परतेने न्याय मिळवून देण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष मा.श्री.निहालभाऊ पांडे यांचे नेतृत्व हे सामान्य जनतेच्या हितार्थ सदैव राबणारे युवा नेतृत्व आहे.

  • धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या पाठीमागून अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे!

    राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर, “आम्हीच मुख्य राष्ट्रवादी आहोत” हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे दोनही गट आपापल्या पद्धतीने करताय. सभा, शिबिर, बैठका, मेळावे भरवून दोघं गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

    त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक 22 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडली. बैठकीत बोलत असताना अजित पवार बोलले की, “कोणत्याही पक्षासोबत आपली युती झाली तरी धर्मनिरपेक्षता व पुरोगामीत्वाच्या भूमिकेशी आणि फुले – शाहू – आंबेडकर यांच्या तत्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही.” आता यावर कोणी म्हणतय दादांनी बोलताना धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा अधोरेखित करून भाजपाला सुनावले; तर कोणी म्हणतय फुले – शाहू – आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा मुद्दा उचलून शरद पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण खरं तर हे दोघं मुद्दे बरोबर आहेत, कसं ते पाहूया.

    तर, अजित पवारांनी “धर्मनिरपेक्षता हे आपलं मुख्य तत्व आहे” असं बोलणं हे भाजपाला पचण्यासारखं नाही. कारण भाजप मंदिर-मस्जिदच्या वादात मंदिराची बाजू घेऊन, जास्तीत जास्त हिंदू आपल्या बाजूने कसे घेता येतील याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळेच गेल्या 30 वर्षापासून भाजपचा पारंपरिक मतदार हा हिंदू असल्याचे दिसते.

    पण त्याचं वेळी धर्मनिरपेक्षता पाळणाऱ्या राष्ट्रवादीला, भाजपा सोबत घेणार असेल तर नक्कीच पारंपरिक हिंदू मतदार दुखावला जाईल यात कोणतीही शंका नाही. कारण भारतीय धर्मनिरपेक्षतेचा एक कंगोरा हिंदू मुस्लिम एकतेचा असल्याने तो आजच्या हिंदुत्ववाद्यांना चालणारा नाही.

    म्हणजेच अजित पवारांनी, धर्मनिरपेक्षता हा आमचा आत्मा आहे असं बोलणं म्हणजे, जर की भाजपाने राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्षतेला काही आडकाठी आणली, तर युती तोडण्याचा देखील विचार होऊ शकतो. असा अप्रत्यक्ष ईशारा भाजपाला दिला, असे म्हणता येऊ शकते.

    याद्वारे अधिवेशन काळात नवाब मलिक प्रकरणामुळे झालेला डॅमेज भरून काढण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला हे मात्र नक्की.

    धर्मनिरपेक्षतेवर ठाम पणा घेत, फुले – शाहू – आंबेडकर आणि पुरोगामित्व हे आपले प्रमुख तत्व आहेत, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला. कारण फुले – शाहू – आंबेडकर ही त्रिसूत्री आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेली पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी रुजवली असेल तर ती शरद पवारांनी. त्याचं विचारधारेला अजित पवार शिरसावंद मानणारा असतील, तर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी पसरवलेली वैचारिक चादर, अजित पवार आपल्याकडे ओढताय, हेच यावरून अधोरेखित होते.

    पुरोगामित्व सांगण्याचा दुसरा फायदा म्हणजे, महाराष्ट्रात फुले- शाहू -आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना मानणारा एक मोठा वैचारिक वर्ग आहे. जो की शरद पवारांच्या पाठीमागे उभा असलेला, आपण बघितलेला आहे. त्या वर्गाला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न अजित पवार करता आहेत.

    म्हणजे अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी, शरद पवारांना सांगितले, की पुरोगामित्व आणि फुले- शाहू – आंबेडकरांच्या विचारांचा ठेका, तुम्ही एकट्याने नाही घेतला. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे, तसंच पक्षाचे वैचारिक वारसदार देखील आम्हीच आहोत.

    अजित पवारांच्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेवरून, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि भाजप दोघांना खालच्या पायरीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो, हे भविष्यात कळेलच.
    तथापि माहिती कशी वाटली? आपली प्रतिक्रिया नोंदवून नक्की सांगा.

  • निष्ठावंत निहाल – गद्दारांच्या छाताडावर शिवसेनेची निष्ठा

    महाराष्ट्र म्हणजे अनेक स्वातंत्र्य योध्ये, क्रांतिकारी, जन चळवळींचे माहेरघर. भारताची वैचारिक घडी बसवणारे, विविध वैचारीक आघाड्यांना आपल्यात सामावून घेणारे, आध्यात्मिक परंपरा जोपासणारे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्राची ही परंपरा अनेक तरुण आपापल्या परीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात.
    आज आपण अश्याच एका तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत. निहाल पांडे त्यांचं नाव.

    निहाल पांडे हे वर्धा येथील आहेत. महिलांच्या, युवकांच्या आणि वर्ध्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आणि त्या प्रश्नांवर उत्तर मिळेपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका घेणार हा तरुण वर्ध्यातील जनतेसाठी आशेचा किरण बनला आहे. वर्धा परिसरात युवकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, महिला बचतगटांच्या काही अडचणी असतील, घरकुल / बेघरांचे प्रश्न असतील, कोणाचे काही कार्यालयीन कामे असतील अश्या प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेऊन सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न निहाल पांडे करत असतात.

    “युवा… परिवर्तन की आवाज” या त्यांच्या संस्थेमार्फत, विविध समाज उपयोगी कामं निहाल पांडे करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील सातगाव येथील बेघर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निहाल पांडे यांनी काढलेली पदयात्रा, सातगाव परिसरातील असंख्य कुटुंबांना आधार देणारी ठरली. नागपूर आणि वर्धा परिसरातील महिला बचतगटांना विविध सोई सुविधा वेळेवर पुरवाव्यात, यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढून,घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न शेकडो महिलांनी केला होता. तेव्हा त्या मोर्चाचे नेतृत्व निहाल पांडे यांनी केले होते.

    हे सगळे असले तरी, निहाल पांडे यांच्यावर प्रामुख्याने शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा असून ते माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रभावित आहे. निहाल पांडे संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश झोतात तेव्हा आले, जेव्हा त्यांनी महाभारत यात्रा काढली. ही यात्रा नागपूरच्या रामटेक येथून मातोश्री मुंबई पर्यंतची होती. महाभारत यात्रेचे उद्दिष्ट म्हणजे लोकशाही मूल्यांच्या विरुद्ध होत असलेल्या राजकारणाचा निषेध आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर सामान्य जनतेचा पाठिंबा उध्दव ठाकरे यांना मिळवून देणे हे होते. या यात्रेत लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तसेच यात्रेची दाखल महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख प्रसार माध्यमांनी घेतली होती.

    पण सध्या चर्चा आहे ती निहाल पांडे यांच्या “निष्ठा यात्रेची”. ही यात्रा 23 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा येथून मार्गस्थ झाली आहे. युवकांच्या, महिलांच्या आणि सामान्य जनतेच्या गावागावांत भेटी घेऊन जनजागृती करत ही यात्रा 31 डिसेंबर रोजी मातोश्री मुंबई येथे पोहचणार आहे. ह्या यात्रेचा मुख्य हेतू बेरोजगारी, महागाई, आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल योजनेचा बोजवारा अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणे असा आहे. तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाताय म्हणून महाराष्ट्र हवालदिल झालंय आणि सरकार दिल्लीवारी करण्यात व्यस्त आहे असे अनेक मुद्दे घेऊन सध्याचे शिंदे – फडणवीस – पवार सरकार जनतेवर कसे अन्याय करते आहे आणि त्या तुलनेत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चांगले होते, अशी जनजागृती करत महाभारत यात्रा निघाली आहे.

    तथापी विविध यात्रा, जनआक्रोश मोर्चे, आंदोलने यांच्या माध्यमातून निहाल पांडे सर्वसामान्य जनतेचा आवाज बनत आहेत. हा आवाज भविष्यात विधानसभेत गाजतो की नाही, हे येणारी वेळच सांगेल.

    आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

  • उद्धव ठाकरेंच्या समर्थनात नेहाल पांडे यांची लाखोंचा जनसागर घेऊन महाभारत यात्रा

    मंडळी महाराष्ट्राला गेल्या कित्येक वर्षांपासून महापुरुषांचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांचा तेजोमय असा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा परकीय लोकांनी महाराष्ट्रातील जनतेवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला.

    तेव्हा तेव्हा इथल्या जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसावर जेव्हा अन्याय करत होते.

    तेव्हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ‘शिवसेना’ नावाचा पक्ष स्थापन करून मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाला

    ” मुंबई कुणाच्या बापाची नाही ” अस बेधडकपणे बोलायला शिकवलं.

    “महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त मराठी माणसाचाच आहे”

    असं निडरपणे सांगितलं. आणि एक एक माणूस जोडून शिवसेना पक्ष उभा केला. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये काही गद्दार लोकांनी कुटील डाव खेळून बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष पळवून नेला. आणि मा. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं या लोकांनी काम केलं.

    महाभारत यात्रा कुणाची व कशासाठी ?

    मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून वर्धा या शहरामध्ये राहणारा नेहाल पांडे नावाचा तरुण हा जनतेच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. आणि याच नेहाल पांडे यांनी ‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेची स्थापना केली.

    आणि असंख्य लोकांना अनेक आंदोलनांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण संविधानाला आणि इथल्या लोकशाहीला घातक आहे असं दिसून येतं आहे.

    म्हणून नेहाल पांडे यांनी अशा गढूळ राजकारणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कौरवांनी कुटील राजनीती करून पांडवांचे राज्य हस्तगत केले होते.

    त्याचप्रमाणे आतासुद्धा काही लोकांनी अशाचप्रकारचे कृत्य करून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मिळवला आहे. अशा कृत्याने या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.

    आणि म्हणून नेहाल पांडे यांनी ‘आपल्या युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेसोबत लाखो लोकांना घेऊन मा. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनामध्ये ‘महाभारत यात्रा’ काढली आहे.

    ही यात्रा नागपुर जिल्ह्यातील रामटेक येथून दिनांक २१ मार्चला सुरू झाली असून दिनांक ३० मार्चला मा. उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानी पोहचून संपन्न होणार आहे. दरम्यान या यात्रेमध्ये लाखो लोकांनी सहभाग नोंदवला आहे.

  • शिंदे सरकार’ वैध की अवैध

    ९ महिन्यांपासून चालत आलेला खेळ अखेर संपला अस म्हणायला हरकत नाही येणारा काळच सांगेल आता सत्ता कोणाची ते…..?

     

    बौद्धिक कुशलतेचा एक नमुना सादर करत पूर्वनियोजित अस धोरण ठरवून महाविकास आघाडीला पराजित करण एवढं सोप्प नव्हतं पण ते म्हणतात ना राजकारणात काहीही होऊ शकत तसचं झाल अखेर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार यांनी भाजप सोबत सत्ता सत्यात आणली.

     

     

    *देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधुन डावलण्यात येतय का ?

    अत्यंत अल्प काळात देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात मिळालेली प्रचिती आणि त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा वापर यातून फडणवीसांनी वेगळी ओळख निर्माण केली

     

     

    भविष्यात हा माणूस नक्कीच पंतप्रधान पदासाठी पात्र राहिला असता पण भाजप चा देवेंद्रजी फडणवीस यांना डावलून पद्दोनती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.

     

     

    भाजपकडून जास्त आमदार बळ असताना सुद्धा भाजप हे उपमुख्यमंत्री पदातच खुश कसे काय राहू शकते हा महाराष्ट्रासाठी एक प्रश्नच आहे.

     

     

    भविष्यात मा.नितीनजी गडकरी आपल्याला पंतप्रधानपदी दिसतील का ?

    एकीकडे भाजप मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर जर माणसांना एखादा व्यक्ती आपलासा वाटतो तो म्हणजे मा.नितीनजी गडकरी जेकी सध्या भाजप चे एक प्रतिष्ठित नेते आहेत

     

     

    जर भाजप सर्वांना समान संधी देत असेल तर यानंतर नितीनजी गडकर्रीना पंतप्रधानपदाचा मान देण्यात येईल का याची उत्सुकता ही संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.

     

    निकालाची उत्सुकता तर आहेच पण शेवटच्या सुनावणीत लागलेल्या अंदाजानुसार सध्याच शिंदे-भाजप सरकार हे पळापळ करतय अस ही काही वृतमाध्यमांनी सांगितलं यातून जनतेन काय समजायच ते तर समजेलच …..

     

     

    पण जर कदाचित हे सरकार अवैद्य ठरलं तर महाराष्ट्राला राजकीय हेरा फेरी च दर्शन झाल अस म्हणायला हरकत नाही.

     

    राजकीय हेराफेरीत पणाला लागणारी थोर पुरुषांची प्रतिष्ठा आणि खुर्ची मिळवण्याच्या नादात पक्षातील लोकच नव्हे तर पक्षाचे चिन्ह सुद्धा उद्धव गटाला गमवावे लागले.

     

     

    पण इतक्या हालाखीच्या परिस्थितीत सुद्धा अतूट महाविकास आघाडीचा नात दिसुन आल , भविष्यात शिंदे गट स्वबळावर मुख्यमंत्री निवडून आणेल का भाजप का मित्रपक्ष म्हणून सोबत ठेवेल ?

     

    का महाविकास आघाडीचा माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाचा आगामी निवडणुकात पराभव होईल ? हे पाहणं मजेशीर राहील.

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

     

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव !

    हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हे एक जगजाणता व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

    त्यांची जगावेगळी कल्पकता आणि व्यंगचित्रकारितेच्या जोरावर एक नवीन ओळख निर्माण करत भारताच्या राजकारणात एक नवी ओळख निर्माण करत स्वतःच अस्तित्व निर्माण केल

    काळानुसार लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढतच गेला .आणि काळानुरूप तयार झालेले बाळासाहेबांचे संघटन हे एका पक्षात रूपांतरीत झाले ,आणि सुरुवात झाली ती शिवसेनेच्या सुवर्ण पर्वाची .

    शिवसैनिक कधी फुटतो का ?

    बाळासाहेब म्हणायचे

    मी चाललो तर मोर्चे निघतील आणि थांबलो तर सभा भरतील.

    याचं वाक्याची तथ्यता ही बाळासाहेबांच्या प्रत्येक कामातून दिसून येत त्यांच्याच कार्याला पुढे नेत त्यांचे पुत्र उद्धवजी ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला आणि बाळासाहेबानंतर शिवसेनेची धुरा हातात घेत पक्ष बांधणीचे काम चालू ठेवले

    पण काळानुरूप बदल होत गेला एक काळ असाही आला की पक्षातील लोकांकडूनच बंड पुकारल्या गेले आणि शिवसेना हतबल झाली.

    हे सगळं चालु असताना उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राचा राजकारणातील सक्रियता दिसून आली पक्षासाठीच मर्यादित न राहता त्या वेळी आदित्य ठाकरे प्रत्येक माणसापर्यंत पोहचले आणि आदित्य ठाकरे यांच्यातील नेत्यासोबत आपलासा वाटणाऱ्या एका पुढऱ्याचे दर्शन झाले.

    महाविकास आघाडीच्या काळात अनेक काम करत लोकांकडून प्रसिद्धी मिळवण्याच काम हे आदित्य ठाकरे यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले आणि शिवसैनिकाच कर्तव्य पार पाडलं.

    तरीसुद्धा सतत विरोधकांकडून होणारी टिका सहन करत या तरुण व्यक्तिमत्वाने खूप काही साध्य करून दाखवले तर हल्लीच त्यांची चर्चा ही होतेय कारणही तसचं आहे कारण त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या नावाचा समावेश या यंदाच्या यंग ग्लोबल लीडर्स यादीत करण्यात आला.

    मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    इतक्या कमी वयात आणि विरोधकांकडून होणाऱ्या टिका सर्वांना दुर्लक्षीत त्यांनी हे सगळं घडवून आणलं तर तेच महाविकास आघाडी च्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान एक युवक त्याच्या नवनवीन योजना देत कसा बदल घडून् आणू शकतो

    हे सांगत आपल्या उमेदवारचा प्रचार केला त्यावेळीं ते नेता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून पाहायला मिळाले .

    कुटुंबाचा वारसा जपत त्यांनी केलेली कामगिरी ही पक्षासाठी महत्वाची तर होतीच पण त्यांनी समाजापुढेही एक नवा आदर्श निर्माण केला.

    आगामी काळ हा शिवसेनेचा असेल अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत….

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात !

    सगळीकडे सध्या जुन्या पेंशन चा वाद पेटलेला दिसताना मनात अनेक लोक आणि त्यांच्या नोकरी अथवा व्यवसायाशी निगडित प्रश्न उभे राहतात कालच्या लेखात पण हे बोलू शकलो असतो पण शब्दमर्यादा मध्ये येते …..

    जुनी पेंशनचा विषय थोडासा बाजूला सारून विचार कराव म्हणलं तर डोळ्यासमोर फक्त इथला शेतकरी राजाच येत होता हो सध्याच्या काळातील अस्थिर अस निसर्गचक्र आणि त्या त्याला निर्भिडपणे तोंड देणारा बळीराजा

    कदाचित तुम्ही अस ही म्हणत असाल की सारख सारख शेतकऱ्याच नाव घेत सरकारला ला शेतकऱ्यांविरोधात दाखवणं पण तस नाहीये नक्कीच यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी न्याय दिला

    सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

    पण जर सरकारी कर्मचारी जुन्या पेंशन साठी संप पुकारू शकतात तर मग शेतकरी इतकी हालअपेष्टा सोसून पण कस हे सगळं सहन करू शकतो.?

    शेतकरी इतका हतबल होतो की त्याला विरोध करण्यापेक्षा जीवन संपवन अधिक सोप वाटत हे इथंच का होत ? 

    इतर राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा आपलाच शेतकरी  मृत्यूला का कवटाळतो याच कारण काय ?

    शेतकरीप्रिय धोरण हे राबवलं जात हे सरकारच म्हणणं आहे पण याची तथ्यता ही फक्त शेतकरीच जाणतो. हल्लीच राज्यसरकर म्हणत आम्ही केंद्रसरकारप्रमाणे शेतकऱ्याला अजून ६००० रु.दिले ज्याणेकरून शेतकरी अजून समृद्ध होईल

    पण खरंच अस होत का पूर्वीच कर्ज शेतकरी परतफेड करू शकला नाही तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही आणि  त्यांचं बँक खात हे होल्ड केल्या जात आणि याच खात्यावर जर सरकारने अनुदान अथवा पीकविमा आला तरी हे खात बँके मार्फत गोठवलं जात

    न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

    जेणेकरून या खात्याचे सगळे व्यवहार हे थांबवले जातात मग त्या खात्यात जरी पैसे आले तरी शेतकरी त्या पैश्यापासून वंचीत राहतोच की …..

    आणि सरकार दुसऱ्या दिवशी विरोधकांची बोलती बंद करत जाहिरात करतात राज्यसरकाचा शेतकऱ्यांना पाठिंबा अहो ते पैसे हे शेतकऱ्याला मिळतच नाही मग याला जबाबदार कोण ?

    निवडनूक काळात तोंडाला येईल तसे आश्वासन देणारे नेते या विषयाला हात का घालत नाही ? 

    का शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य तो बाजारभाव उपलब्ध करून देत नाही आणी जरी भाव हा समाधानकारक असला तरी भाडे आणि मध्यस्थी लोकांना पैसे देत देत शेतकरी हा गरीबच राहतो की,

    अहो जर इथल्या शेतकऱ्याला लावलेला पैशाही वसूल होत नाही इतपत वाईट परिस्थिती ही इथल्या राजावर येते मग तुम्हीच सांगा शेतकरी कसा मजबूत होईल.

    आणि जर शेतकरी पूर्वीच्या थकीत कर्जामुळे नवीन कर्जाला पात्र राहत नाही परिणामी इतर ठिकाणाहून पैसे घेतो आणि  पुन्हा जर तेच घडले तर शेतकरी जाणार कुठ कुटुंबाच्या उदरनिर्वाह हे तर कारण आहे

    पण जुन्या संस्कृतीला हाच राजामाणूस संभाळतो मग या माणसाला चालना देण्यात इतक राज्यसरकार माग का पडतय की शेतकऱ्यांपेक्षा त्यांना जुनी महत्वाची वाटू लागते.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

    अहो कसलं मिशन आणि कोणती जुनी पेंशन …..?

    नसेल जमत तर द्या ना सोडून नोकऱ्या…

    इथ उच्चशिक्षित आणि पात्र ,पदव्युत्तर युवक आहेत भरपूर काय गरज आहे जुन्या पेंशन ची ?

    २००४ साली विशेष निरीक्षणा अंतर्गतच ही योजना रद्द करण्यात आली मग उगाच जुने पुराणे मुद्दे काढून कशाला ढवळाढवळ करायची .अहो महाराष्ट्र राज्यात असे कितीतरी उमेदवार आहे जे की नोकरी करू इच्छितात

    आणि खास म्हणजे ते इच्छुक बऱ्यापैकी युवक आहेत. मान्य आहे की काही राज्यामध्ये जुनी पेंशन योजना लागू केलेली आहे पण खर पाहता महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी जुन्या पेंशन वर जगतो का या गोष्टींची पण शहानिशा राज्यसरकारणे करायला हवी

    कोणताही माणूस हा सरकारी काम म्हणलं की डोक्यात विचार आणतो तो आपलं काम कस लवकर होईल याचा, मग तुम्हाला तर माहीतच आहे एखाद सरकारी काम लवकर झाल तर ते लवकर कस होत अथवा त्याला काय कारण असतात ते .

    न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

    १८ लाख लोक संपावर जाऊन सरकारला जे काही जुन्या पेंशन बाबत सक्ती लादण्याचा प्रयत्न करत आहेत तो कदाचित योग्य ही असावा पण महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या आणि ऑटोमेशन च्या नावाखाली कमी होणारा रोजगार याचा इथल्या कुटुंबावर फरक पडतोय त्याच काय ?

    जर कुटुंबातील एखादा कर्मचारी सरकारी नोकरीला असेल तर तो त्याच्या नोकरीच्या काळात अनेक सरकारी योजणांचा लाभ सरकारी सेवक म्हणून घेत असतो पण

    जर त्याला नोकरीनंतरसुद्धा सरकारने त्याचा सांभाळ करावा अशी मानसिकता जर इथला सामान्य माणूस बाळगत असेल तर ते चुकीचं ठरेलं या धोरणाचा अवलंब केला तर विकास सोडा पण महाराष्ट्राला कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही.

    देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

    हल्लीच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते आपल्याकडे रोजगार आहे पण इथल्या युवकांमध्ये कौशल्ये नाहीत . पण अजून पण कळलं नाही की त्यांना माहित असलेले रोजगार कोणत्या क्षेत्रातील आहेत आणि किती आहेत ते ?

    जर खरंच त्यांच्या बोलण्यात तथ्यता होती तर युवकांमध्ये कौशल्ये प्रस्थापित करणारी मोहीम पण तर ते चालू करू शकले असते …

    असो विषय भरकटंतोय अस आपल्याला वाटतही असेल पण सांगायचा उद्देश हाच की एकाबाजुला इथल्या लोकांना रोजगार प्राप्ती नाहि तर तेच स्वतःच आयुष्य संरक्षित असताना सुद्धा नोकरीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी १८ लाख लोक एकत्र येऊन बंद पुकारताय

    तर यावर सरकारला योग्य ती कार्यवाही करायला हवी .असो यावर सरकारचा निर्णय होईल तो होईल पण मध्यंतरी या मुद्द्यावर जनतेकडून आपआपली मत मांडण्यात येतात बहुतांश लोक हे सरकारी सेवक लाच घेतात

    या मुद्द्यावर जोर देत जुनी पेंशन ला विरोध करताय पण जर एका दुसऱ्या बाजूने बघायचं झाल तर अस दिसत की शासकीय आणि अशासकीय सेवक वर्गात विरोधाचा वाद पेटवला जातोय हे थांबायला हव कारण हा महाराष्ट्र आहे

    आणि इथला प्रत्येक माणूस त्याच्या हक्कासाठी सांविधानिक लढा देऊ शकतो म्हणजेच हा लेख फक्त आणि फक्त माझ्या दृष्टीकोनातुन लिहिण्यात आलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात नक्कीच नवीन रोजगार निर्मिती करत सरकार जुनी पेंशन संदर्भात जनतेला साजेल असा निर्णय घेईल अशी अपेक्षा ठेवता येईल

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir