Author: admin

  • विनायकराव पाटिल

    मराठवाड्याच्या मातीत अनेक थोर संत, महात्मे, साहित्यिक, विचारवंत, कवी, राजकारणी जन्माला आले. यातील एका थोर विभूतीचा मराठवाड्याच्या मातीस परिसस्पर्श झाला आणि येथे शैक्षणिक क्रांती घडून आली.

    खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरांत ज्ञानाचा दीप उजळला. या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतिसिंह कै. विनायकराव पाटील अण्णा हे त्यातले एक .

    कै. विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील लोणी या खेड्यात 1 सप्टेंबर 1926 रोजी झाला. त्यांचे वडील कै. पांडुरंगराव जाधव हे प्राथमिक शिक्षक होते. घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती.

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    विनायकराव लहानपणापासूनच रोखठोक व स्वाभिमानी बाण्याचे होते. ज्ञान संपादनासाठी त्यांनी जिवाचे रान केले. एलएलबीची पदवी मिळवून ते बॅरिस्टर झाले.

    मात्र वकिली व्यवसायापेक्षा समाजसेवेचे व्रत घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. खूप अनुभव घेतले, माणसे जोडली. अनेक कटू अनुभव पचवले; परंतु कडवट भावना मनात रुजू दिली नाही.

    त्यांच्या विचारांवर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. ते यशवंतरावांच्या पुरोगामी नेतृत्वाकडे आकर्षिले गेले. महाराष्ट्रात तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले.

    मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागाचा कायापालट करावयाचा असेल तर शिक्षणासारखे प्रभावी दुसरे साधन नाही, हे त्यांनी ओळखले.

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    14 सप्टेंबर 1958 रोजी यशवंतरावांच्या प्रेरणेने त्यांनी आपले सहकारी दादासाहेब सावंत व इतर सच्च्या निष्ठावान सहका-यांना सोबत घेऊन ग्रामीण भागातील गोरगरिबांची, शेतक-यांची, शेतमजुरांची मुले शिकावीत, त्यांना रोजी-रोटी मिळावी, सन्मानाने जगता यावे यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.

    1967 मध्ये वैजापूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली व प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.

    शिक्षण क्षेत्रावरील प्रेम व निष्ठा, तसेच सहकारी जीवनपद्धतीवर त्यांचा ठाम विश्वास होता. वैजापूरसारख्या दुष्काळी भागातील शेतक-यांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली.

    नांदूर-मधमेश्वर, मन्याड, शिवना टाकळी तसेच पालखेड डाव्या कालव्याचे पाणी शेतक-यांना मिळावे म्हणून मोलाचे प्रयत्न केले.

    ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी सहकार क्षेत्रात साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध उत्पादक संस्था, सहकारी बँकांना बळकटी देऊन समाजोन्नतीसाठी दूरदृष्टी दाखविली. कोणतेही पद सेवेसाठी असते याची प्रचिती सर्वांना आणून दिली.

    28 डिसेंबर 1968 ला वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी विनायकरावांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आदर्श आजच्या काळात निश्चितच दिशादर्शक आहे. अशा थोर क्रांतिसिंहास कोटी-कोटी प्रणाम!

    आणि आज त्यांची जयंती आहे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    सामनाची स्थापना शिवसेनेने नाही, तर या व्यक्तीने केली..सामना चा इतिहास

    सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

    शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

    ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • क्रांतीगाथा अंतिम भाग

    असे नव्हते की या क्रांतिकारकांची फाशी थांबावी म्हणून प्रयत्न झाले नाही…

    नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद मैदानात फाशी होऊ नये म्हणून म्हटलं , भगतसिंग यांच्या वडिलांनी सुद्धा प्रयत्न केले , महात्मा गांधी यांनी  सुद्धा व्हाइसरायशी रोखावी म्हणून बोलणं केलं…

    लोकांनी स्वाक्षरी करून, रक्ताचे शिक्के उमटवत पत्र सुद्धा लिहिले…

    #क्रांतीगाथा भाग ७

    पण भगतसिंगांना स्वतःलाच ती फाशी हवी होती…

    ” तो स्वतः च बोलला मै ऐसी कैद भरी  जिंदगी नही जी सकता और मै क्रांतिकारक हु ब्रिटिश हुकुमत मुझपर गोलीया चलाये….

    आणि लाहोर जेलला तो फोन आला…

    फासी एक दिवस अगोदर द्यायची आहे…

    २३ मार्च १९३१ , १४ नंबर च्या कैदखान्याचे गेट हलले , तो तेवीस वर्षाचा भगत लेनीन वाचत बसला होता, पुस्तकाचं शेवटचं पान अपुर्ण होतं , एका क्रांतिकारकांची भेट दुसऱ्या क्रांतिकारकांशी अपुर्ण ठेवून भगत बाहेर आला….

    #क्रांतीगाथा भाग ६

    राजगुरु आणि सुखदेव यांना बाहेर काढण्यात आलं तीघांचे वजन करण्यात आले  , अंघोळ झाली…

    आणि तो क्रांतिकारकांचा जथ्था बाहेर पडला….

    अवघं लाहोर चं सेंट्रल जेल हादरलं..

    इंकलाब जिंदाबाद चे नारे जोरजोर्याने लागत होते, सर्व क्रांतिकारक या तीन मित्रांना अखेरचा निरोप देत होते…

    तिघांच्या डोळ्यात इंकलाबी चा जज्बा जमला… ओठात शब्द उमटले…

    ” मरके कैसे जीते है…इस्स दुनिया को बतलाने तेरे लाल चले है माये अब तेरी लाज बचाने…

    आझादी का शोला बनके खुन रगो मज डोला ….माये रंग दे बसंती चोला…

    खुश रहो ए अहले.वतन अब हमतो सफर करते है….

    पर….पर….!!

    दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फत की….मेरी मिट्टी से भी खुशबू ए वतन आयेगी….!!

    आणि हसुन जेलर ला भगत म्हणाला…

    “खुशनसिब हो  तुम जो आज.देख पा रहे हो की क्रांतिकारक अपने वतन के लिये कैसे मौत को हसकर गले.लगाते है….!!

    फाशीचे तख्त दिसताच तिघाचा वेग वाढला जणू एकमेकाशी फाशी वर अगोदर कोण चढणार म्हणून स्पर्धाच  लागली होती…

    तख्तावर येताच अखेर इच्छा म्हणून तिघांच्या हातांना मोकळे करण्यात आले…

    तीघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली…

    भगतसिंग जोर्याने ओरडला

    ” इंकलाब जिंदाबाद… !! “

    आणि राजगुरु सुखदेव म्हणाले….

    भगतसिंग जिंदाबाद….

    तिघांच्या तोंडावर काळा कपडा चढला , हात बांधण्यात आली… आणि संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनटांनी तिघांचे स्वप्न पूर्ण झाले….

    वतन के लिए शहादत का ख्वाब…..

    या स्वतंत्रदिनी या सर्व क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन🇮🇳

    ” पर हम है तुममे , सबमे…..की जब जब वतन के लिए खडे होने का वक्त आये तो ये क्रांतीगाथा तुममे तब भी जिंदा है…..!! “

    भारत माता की जय…..🇮🇳

    ✍🏻अक्षय चंदेल © 

    #जिगरे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • #क्रांतीगाथा भाग ७

    #मा…भारत… मा…

    भगत !!! पुत्तर !!!

    १४ नंबर च्या त्या कैदखान्यात भगतसिंगांच्या कानावर आवाज पडला…

    तसाच तो तेवीस वर्षाचा मुलगा धावत धावत गेट जवळ आला…

    बाहेर डोक्यावर डुपट्टा कायम ठेवणारी भगतसिंग ची आई विद्यावती कौर  उभी होती…

    हातात रसगुल्ला चा भरलेला डबा होता..

    भगत ला काय आवडतं काय नाही याची क्षणाक्षणाला खबर ठेवणारी भगतची आई भगतला बघताच रडायला लागली…

    ” कैसा है ?? “

    अंगावर असलेल्या जखमा पाहून सुद्धा  मनाला धीर देत तीचे ते ओठ पुटपुटले…

    ” ठिक हू !! आप कैसे हो ?? “

    तेरे सिवा कैसी रह सकती हु पुत्तर ? सब कहते है… तैनु फासी होने वाली है….ये आखरी वक्त मिल रहे है हम ,पर भगत मैनु पता है रब तुझे मुझसे अभी अलग नही करेगा ,

    मा !! भगत आपल्या आईच्या हाताला स्पर्श करून म्हणाला…

    ” इक गल दस्सो !! यहा कितने सारे बच्चे है जो ऐसेही दुर जाने वाले है….वो राजगुरू अबतक अपने घरवालो से नही मीला… !! पर पता है हरकोई एक बात जानता है…की नाही अपने मा से दुर होकर भी भारत मा के आचल मे हम महफुज है…..और तुम तो भगत की मा हो….तुम्हे तो सब अपना आदर्श मानते है….तो मा बस्स एक बात मानना मेरी लाश लेने आप मत आना…क्योकी आप आओगी तो रोओगी और मै नही चाहता की कोई ये कहे की भगत की मा रो रही है….

    आपल्या लहानग्या पोराच्या तोंडुन हे शब्द ऐकून विद्यावती देवी ने आपले अश्रू पुसले….

    #क्रांतीगाथा भाग ५

    भगत सबको छोडके चला जायेगा तु… नही बेटा तु नही जायेगा…. इंकलाब जिंदाबाद इस आवाज मे तु हमेशा जिंदा रहेगा….

    आणि भेटीचा वेळ संपला…. रडतच त्या पालटल्या एकदा डोळे भरून शेवटचचं भगत ला बघितलं… एक अश्रूचा थेंब भगतसिंग च्या डोळ्यातुन सुद्धा कोसळला..

    तिकडे सुखदेव आपल्या घरच्यांच्या आठवणीत व्याकूळ झाला…

    राजगुरूंच्या डोळ्यात अश्रू तरले…

    गेली कित्येक वर्षे आपल्या घरच्यांना सोडून भारत मातेसाठी निघालेल्या राजगुरू ला सुद्धा आपल्या आईच्या कुशीत एकदा डोकं ठेवायचे होते…

    #क्रांतीगाथा भाग ६

    दगडाच्या त्या कैदखान्यात आईचं प्रेम पांघरूण कुठेही नव्हती…

    भारत मातेच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते पण पारतंत्र्याच्या बेडीत बांधलेले हात आपल्या लेकरांच्या डोक्यावरुन कसे घुमवावे ??

    तिकडे महाराष्ट्र च्या खेड (राजगुरूनगर ) मध्ये एक पदर अजूनही आपल्या लेकराची वाट बघत होता , पार्वती बाईचे डोळे कवाडाकडे लागलेले…..

    ” राजगुरु….कधी तरी परतशील न लेकरा….!! “

    पण क्षण ठरला होता २४ मार्च १९३१ … भगत , सुखदेव आणि राजगुरु च्या फाशीचा…..

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • #क्रांतीगाथा भाग ६

    #आझाद हु मै……

    हम चले मौत को गले लगाने हिंद वतन के परवाने..!!

    इश्क मे रंग के रंगे हुए हम आझादी के दिवाने..!!

    १२ मार्च १९३० मिठावर लागलेल्या करीच्या विरोधात महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाने स्वदेशी ची आगळीवेगळी लाट उभी केली..

    भारताच्या इतिहासात आझादीचा वणवा पेटला होता..

    भारताच्या स्वतंत्रयुद्धाच्या निर्णायक समराची ही सुरुवात होती…

    अहिंसा आणि सशस्त्र या दोन्ही क्रांतींनी ब्रिटीशांच्या नाकीनऊ आणले होते…

    भारतीय क्रांतिकारकांच्या विरोधात ब्रिटिशांच्या मनात आग लागलेली होती…

    त्यातल्या त्यात अनेक क्रांतिकारकांची धरफकड होत नव्हती…

    #क्रांतीगाथा भाग ५

    भगतसिंग, जतीन दा , सुखदेव, राजगुरू, यान सारखे असंख्य क्रांतिकारकांची फौज उभे करणारे चंद्रशेखर आझाद हा मुक्त होते आणि त्यांना पकडणे ब्रिटिशांना सर्वात महत्त्वाचे झालेले….

    २७ फेब्रुवारी १९३१

    क्रांतिकारकांच्या अग्रगणी  चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यात थोडी सुद्धा विश्रांती नव्हती.

    भगतसिंग यांच्या कैदैनंतर आणि उपोषणाने क्रांतीची लाट उभी केली…

    एक नैतृत्व कसे असावे याचे उदाहरण म्हणजे चंद्रशेखर आझाद..

    आपले  यांना भेटण्यासाठी चंद्रशेखर अल्फ्रेड पार्क मध्ये आलेले….

    ब्रिटिशांना हा आझाद कधीच पकडता आला नाही… हा आझाद म्हणजे ब्रिटिशांच्या डोळ्यात सलणारा अफ्ताब होता…

    म्हणून ब्रिटीशांनी आपली चाल टाकली..

    फितुरीच्या काळोखाला हाताशी  धरून स्वतंत्रसूर्याला कैद करण्यासाठी  अल्फ्रेड पार्क ला ब्रिटीशांनी घेराव केला…

    आणि धाड धाड करत गोळीबार सुरू झाला…

    त्याचं प्रत्युत्तर सुद्धा आझाद तेवढ्याच तडाख्यात देत होते.. आझादांची बंदुकीची प्रत्येक गोळी ब्रिटिशांना मारत सुटली पण नियतीने आपला फेर फिरवला…

    क्रांतीगाथा भाग ४

    आझादांकडे शेवटची एकच गोळी उरली…

    काय करावे?? शरणागती पत्करावी??

    नही !!! हम आझाद है और आझाद ही रहेंगे….

    आझादांनी आपल्या मातृभूमीची माती मस्तकावर लावली…

    त्या मातीत आझादांच्या डोळ्यातील अश्रूचा एक थेंब एकरूप झाला…

    ” माफ करदेना ए वतन , तुझे आझाद करने का ख्वाब अधुरा रह गया !!! पर मै आझादी की लौ बनकर जिंदा रहुगा हमेशा !! “

    आणि धाड्ड….ड्ड…..ड्ड……

    गोळी चालली…

    आझादांनी स्वतःच्या हातातील बंदुकीने आपल्या जिवनाचा शेवटचा नारा बनवला…

    डोक्यातून रक्ताची धार निघाली…

    भेदक नजरा तश्याच उघड्या रोखून

    खुश रहो ए वतन म्हणत….

    शब्द थांबले , श्वास रोखून , आपल्या जन्मभूमीला मुक्त करण्याची स्वप्न असंख्य क्रांतिकारकांच्या ह्रदयात पेटवून  आझादी आझाद शेवट करून निघाले ..

    आझादांनी बलिदान दिले आणि एका अभेद्य क्रांतिचा शेवट झाला….

    ✍🏻अक्षय चंदेल©

    #जिगरे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • #क्रांतीगाथा भाग ५

    #ए वतन तेरे लिये

    लाहोरच्या तुरुंगात भगतसिंगांना कैद करण्यात आले…

    जगभरात स्वतःच्या अनुशासनाचे बोंब मारणारे ब्रिटिश क्रांतिकारकां सोबत अगदी अमानुषपणे वागत होते , जेवणाच्या नावाखाली अपोषक जेवण , पाण्याची सोय सुद्धा पुरक नाही , स्वच्छता च्या नावाने बोंब ,

    रोज कैद्यांना मारायचं पण मानसिक खच्चीकरणाच्या नावाखाली जनावरांप्रमाणे वागणूक क्रांतिकारकांना दिली जात होती आणि अश्यातच या अमानुषपणावर इंकलाबी आवाज क्रांतिकारकांनी  उठवला….

    आमरण उपोषण !!

    उपोषणाला सुरुवात झाल्यावर क्रांतिकारकांनी अन्नाचा त्याग केला…

    ब्रिटिशांच्या प्रत्येक अत्याचार ला कणखरपणाने सर्व समोर जात होते..

    तिकडे आझादांनी या उपोषणाला भारतभर पसरवण्याचे कार्य केले…

    ब्रिटिशांवर.दडपण येत होते..

    रोज क्रांतिकारकांवर मारहाण होत होती , तहान लागेपर्यंत मारायचं जेणेकरून उपोषण थांबेल…

    क्रांतीगाथा भाग ४

    पण क्रांतिकारक मागे हटायला तयार नाही , पाण्याएवजी दुध, दही ने माठ भरून ठेवले पण क्रांतिकारकांनी तेही फोडून टाकले ,

    क्रांतिकारकांच्या लघवीच्या जागेवर लाथांनी मारण्यात आले , लाठी मार केले , अंगावर मिठ लावून मारले पण तरीही क्रांतिकारक काही झुकेना..

    ही लढाई फक्त भुकेची नव्हती यात अन्न पाणी सोबत मागणी होती ती पुस्तकांची सुद्धा…!!

    या अत्याचार ला थांबवण्यासाठी आझादांनी आणि भगवती चरण वोहरांनी बॉम्ब ने जेल ची भिंत पाडण्यासाठी प्रयत्न केला…

    क्रांतीगाथा भाग ३

    पण नियती ती  क्रूर  या प्रयत्नात भगवती वोहरांना जीव  गमवावा लागला…

    ब्रिटिशांनी अमानवी अत्याचार ला सुरुवात केली , क्रांतिकारकांच्या नाका, तोंडात नळ्या टाकून दुध जबरदस्तीने ओतण्याचे प्रयत्न केले ,

    असाच प्रयत्न जतीन दा वर सुद्धा झाला पण ती नळी जाऊन त्यांच्या फुफ्फुस ला लागली , संसर्ग वाढले , रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या , भगतसिंगांनी जतीनना थांबण्यासाठी सांगितले पण जतीन थांबले नाही…

    शेवट पर्यंत उपोषणवर अटळ राहिले आणि भारत मातेच्या चरणी आपले श्वास अर्पण करून टाकले….

    भगवतींच्या मरणाचं दुख मागे ठेवून त्यांच्या पत्नी दुर्गाभाभी नेहमी प्रमाणे क्रांतिकारकांच्या मदतीला पुढे आल्या..

    जतीन दासांचा देह त्यांनी बाहेर काढला..

    जतीन दाच्या देहाचे स्विकार करण्यासाठी खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस आले…पाच लाख लोकांच्या अश्रूंनी जतीन दाचा अंत्यसंस्कार झाला…

    पण उपोषण तसेच सुरू राहिले…

    भगत ब्रिटिशांच्या हरामखोरी वर हसत राहिले…

    एकदा तर भगत ला विचारले सुद्धा…

    “एवढे होऊन सुद्धा हसतोय तु भगत…!! ”

    आणि भगत म्हणाले…

    ” माझ्या हसण्याने तुम्हाला आज एवढा त्रास होतोय तर त्या क्षणी काय कराल जेव्हा मी फासीच्या तख्तावर असेल आणि जोरजोराने इंकलाब जिंदाबाद चे नारे देत असेल….!! “

    शेवटी ब्रिटिशांना झुकावं लागलं, क्रांतिकारकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या तिकडे लंडन मध्ये भगतसिंग ला फाशी द्या म्हणून तेवीस वर्षाच्या पोराच्या विरोधात मोर्चे निघायला लागले….

    ” ए शहिदे मुल्को मिल्लत मै तेरे उपर निसार…

    अब तेरे हिम्मत का चर्चा गैरो की महफील मे है….”

    सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है…

    ✍🏻अक्षय चंदेल©

    #जिगरे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • क्रांतीगाथा भाग ४

    ब्रिटीशांनी घाव फक्त शरीरावरच घातले नव्हते…

    इथल्या कष्टकर्यांना , मजदूरांना त्यांच्या हक्काची मजदुरी ही मिळणे कठीण केले होते ,  शिक्षणाची सोय सुद्धा गरिबांच्या आटोक्यात नव्हतीच , भारतीयांचा राजकीय प्रवेश सुद्धा ब्रिटिशांना अमान्यच होता…

    गरिबीची झड , हिंदू मुस्लिम मतभेद उभे करून सत्तेची मलाई ब्रिटिश चाखत होते , डोळे झाकून अत्याचार करणार्या ब्रिटिशांना भारतीयांच्या किंकाळ्या ही ऐकू येईना आणि मग ठरलं या ब्रिटिशांना आवाज ऐकवायचा इंकलाब चा नारा ऐकवायचा….

    क्रांतीगाथा भाग ३

    पण नेमके कसे तर केंद्रीय असेंबली मध्ये बॉम्ब फेकुन धमाका करायचा पण फक्त आवाज येईल असा….त्यामुळे कुणाला दुखापत होऊ नये याची तस्तदी घेऊन…

    आझादांनी योजना आखली….

    बॉम्ब फेकून लगेच तिथून निघायचं आपल्या क्रांतिकारकांची धरपकड होऊ नये पण भगतसिंगांच्या मनात काही वेगळे होते…

    ” आझादजी अपने छोटे भाई की एक बात मानोगे….!! स्फोट करतेही हम चाहते है की हम गिरफ्तार हो ताकी दुनियाको भी पता चले की हम सरफिरे नही सरफरोशी है ….जो अपने वतन के लिये मर भी सकते है….!! “

    भगत….!! पर ….आझाद अळखडले…

    यहा गुरु गोविंदसिंह ने अपने बेटे वारे है तो हम क्या ?? भगतसिंग शब्दात बलिदानाच्या गाथेचा शब्द उमटला…

    दुसरीकडे राजगुरू भगतसिंगांना ओरडून म्हणत होते…

    ” मै भी आऊंगा….!! मुझे भी वतन के लिये मरना है…!! “

    राजगुरू रात्रभर रडत होते फक्त आपला जीव देशावर वाहता यावा म्हणून…

    पण अगोदरच योजना आखली गेली होती बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंगांनी केंद्रीय असेंबली मध्ये प्रवेश केला…

    #क्रांतीगाथा भाग २

    आणि धडाड धुम्म करत बॉम्ब चा आवाज झाला पण त्या ही पेक्षा एक आवाज अधिक बुलंद होता…

    ” इंकलाब जिंदाबाद , ब्रिटिश हुकुमत मुर्दाबाद !! भारत माता की जय….!! “

    भगतसिंग आणि बटुकेश्वर यांना अटक करण्यात आली…

    आणि आझादांच्या तोंडुन सर्व क्रांतिकारकांपुढे शब्द उमटले…

    ” मेरे भगत की शादी तय हो गयी दोस्तो…. पर शायद मै वो देख नही पाउंगा…. इंकलाब जिंदाबाद… !! “

    आणि हे सत्य सुद्धा होते !! या सर्व क्रांतिकारकांनी आपली प्रेयसी फक्त आझादी मानली होती…

    स्वतंत्रता…..पुर्ण स्वतंत्रता…

    आझादांच्या नैतृत्वाखाली आझादीचा लढा सुरू होता आणि जेलमध्ये एक लढा लढण्यासाठी भगतसिंग तयार होते…

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • क्रांतीगाथा भाग ३

    क्रांतिकारकांच्या घरची अवस्था काय असेल याचा आम्ही विचारही करु शकत नाही…

    सर्वस्व अपर्ण करून फक्त स्वतंत्र दर्पण बघण्यासाठी आपली तरुण मुले भारतमातेच्या चरणी अर्पण करून टाकली होती अनेकांनी…

    ब्रिटिशांच्या अत्याचारच्या काळोखात आझादी शोधणे खूप कठीण काम होते…

    जालियनवाला बाग

    रोज नवनवीन पारतंत्र्याचे प्रयोग भारत भुमीवर सुरू होते…

    अश्यातच ३ फेब्रुवारी १९२८ ला सायमन कमीशन भारतात आले..

    भारतीयांना संवैधानिक अधिकार देण्याची वरवर बाता मारणार्या गोर्यांनी अधिकार सुद्धा आपल्या हातात डांबून ठेवले होते…

    ज्याचा  कांग्रेसच्या नैतृत्वाखाली सायमन गो बॅक चा आवाज उठला….सायमन ला परत पाठवण्यासाठी आणि भारतियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी

    लखनौ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि गोबिंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली आणि लाहोर येथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला…

    #क्रांतीगाथा भाग २

    ब्रिटिशांनी बेभान होऊन लाठीचार्ज केला…

    रक्ताच्या थारोळ्यात आझादी चे नारे लागत होते , आणि धाड करत एक लाठी लालाजींच्या डोक्यावर आदळली…

    डोक्यावर मोठा घाव झाला…

    आपल्या जन्मभूमीला मुक्त करण्यासाठी लालाजींनी अंतिम शब्दात आपल्या प्राणांची आहुती दिली…

    “मेरे शरीर पर पड़ी एक-एक चोट ब्रिटिश साम्राज्य के क़फन की कील बनेगी। “

    आणि झालेही तसचे लालाजींचा प्रतिशोध घेण्याची अग्नी आझाद आणि भगतसिंगांच्या मनात तळफडत होती…

    ब्रिटिश अधिकारी सांडर्सला मारण्यासाठी   आझाद, भगतसिंह आखणी करत होते..   

    “दयानंद अँग्लो विद्यापीठ’ पुढे सर्व काही घडणार होते… याच विद्यापीठ पुढे आझादांनी भगतसिंग यांना प्रश्न विचारला..

    “क्या कोई रणरागिणी है जो हमारे रणजित से शादी करे.??

    आणि भगतसिंग हसत हसत म्हणाले..

    “हमारी शादी तो आप ही तय करोगे..!!”

    ” मेरी कलम मेरे जज्बातोसे वाकीफ है  की मै इश्क भी लिखना चाहु तो इंकलाब लिख जाती है…!! “

    आणि लग्न ठरलं तेही खुद्द मृत्यूशी दिनांक 17 दिसंबर, 1928 जयगोपाल यांनी इशारा करताच ब्रिटिश  ऑफ़ीसर सांडर्सला राजगुरू ने बेभान होऊन गोळी मारली….

    मागे मागे भगतसिंग ने अंधाधुंद गोळीबार करून सांडर्स ठार  करून या क्रांतिकारकांनी लालाजींच्या हत्याचा प्रतिशोध घेतला पण आमचे मनच मेलेली होती हो …

    या क्रांतिकारकांना पकडण्यासाठी चनन सिंह नावाने आपलाच माणूस मागे धावला पुन्हा पुन्हा आझादांनी समझुत देऊनही ब्रिटिशांच्या पायावर आपले इमान.विकलेल्या चनन ला या क्रांतिकारकांचा जज्बात ए वतन कळालं नाही ,

    धाड धाड करत आझादांनी त्याला तिथेच संपवले… आणि एका नव्या क्रांतीगाथेची सुरुवात झाली…

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • #क्रांतीगाथा भाग २

    जालियनवाला बाग मध्ये पेटलेल्या चितांनी एक क्रांतीचा भडका अवघ्या भारतभर पसरवला…

    जागोजागी आंदोलने उभे राहिले…

    अश्यातच एक  अहिंसेच्या शब्दांचा आवाज अवघ्या भारताला एक करत सुटला नाव होते मोहनदास करमचंद गांधी…

    महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाचा पुकार केला आणि स्वभाषा, स्वभुषा , आणि स्वदेशाची आवाज बुलंद झाली…

    अनेक क्रांतिकारक गांधीजींच्या या चळवळीत एकरूप झाले , ब्रिटिशांच्या विरोधात असहकाराची भावना निर्माण होऊन अनेक सत्याग्रह पूढे आले आणि अश्यातच…

    जालियनवाला बाग

    चौरी चौरा येथे ब्रिटीश पोलीस अधिकार्यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांचा भडका उडाला तीन आंदोलनकर्त्यांच्या कत्तल झाल्या आणि अश्यातच संयम तुटलेल्या सत्याग्रहींनी पोलीस स्टेशन मध्ये आग लावली ज्या मध्ये २३ ब्रिटिश अधिकारी जळून खाक झाले…

    पण गांधींना ही अहिंसा नको होती , म्हणून त्यांनी असहकार आंदोलन मागे घेतले , पण क्रांतिकारक आपले पाय मागे घ्यायला तयार नव्हते . गांधीजींचं तत्व

    ” अहिंसा परमो धर्म ……”

    चे होते पण तो श्लोक अपुर्ण होता , त्या श्लोक पुर्ण करण्यासाठी क्रांतिकारकांची आवाज उठली

    ” धर्म हिंसा तथैव च !! “

    अश्यातच ९ ऑगस्ट १९२५  सरफरोशचा बुलंद आवाज काकोरी स्टेशन वर  उठला…

    वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमान, हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है

    खैंच कर लायी है सब को क़त्ल होने की उम्मीद, आशिकों का आज जमघट कूच-ए-क़ातिल में है…

    सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है…

    रामप्रसाद बिस्मिल ,अशफाक उल्ला खाँ, राजेन्द्र लाहिड़ी, चन्द्रशेखर  आजाद, शचीन्द्रनाथ बख्शी, मन्मथनाथ गुप्त, मुकुन्दी लाल, केशव चक्रवर्ती , मुरारी लाल गुप्ता क्रांतिकारकांच्या हातांनी ब्रिटिश खजिना लुटून काढला…

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    दौलत पेक्षा अनमोल खजिना होता तो क्रांतीचा कारण या घटनेने क्रांतिकारकांचा जज्बा आणखिनच वाढला..

    आपल्या जन्मभूमी ला जीव अर्पण करण्यासाठी रामप्रसाद बिस्मिल , अश्फाकउल्लाखान ,रोषण सिंह फाशीच्या तख्तावर चढत असताना सुद्धा अश्फाक म्हणत होते…

    ” मरते बिस्मिल ,रोषण लहिरी ,अश्फाक अत्याचार से…

    होगे पैदा सैकड़ो इनके रुधिर के धार से…”

    फाशीच्या फंद्यावर चढत असताना एकदा रामप्रसाद बिस्मिल ने युनियन जॅक कडे बघितलं आणि म्हणाले…

    सेवा में तेरी माता ! मैं भेदभाव तजकर;

    वह पुण्य नाम तेरा, प्रतिदिन सुनूँ सुनाऊँ ।।

    तेरे ही काम आऊँ, तेरा ही मंत्र गाऊँ।

    मन और देह तुझ पर बलिदान मैं जाऊँ ।।

    भारत माता की जय….

    आणि हसत हसत फाशीवर ही स्वतंत्रपूजक चढली…..

    अश्फाक उल्ला खान खुदा ला आपल्या धर्मापलिकडे जाऊन शेवटच्या क्षणी मागणं मागत राहिले…

    जाऊँगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जायेगा,

    जाने किस दिन हिन्दोस्तान आज़ाद वतन कहलायेगा?

    बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं “फिर आऊँगा, फिर आऊँगा,

    फिर आकर के ऐ भारत माँ तुझको आज़ाद कराऊँगा”.

    जी करता है मैं भी कह दूँ पर मजहब से बंध जाता हूँ,

    मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ;

    हाँ खुदा अगर मिल गया कहीं अपनी झोली फैला दूँगा,

    और जन्नत के बदले उससे एक पुनर्जन्म ही माँगूंगा!

    #जिगरे

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जालियनवाला बाग

    हिंदुस्थानात उतरलेल्या परकीय ब्रिटिशांनी भारताच्या भुमी, संस्कृती, इतिहास, वर्तमान ते भविष्यवरही घाला घातला होता…

    १८५७ चे स्वतंत्रसमर  अनेक किंकाळ्यांच्या आवाजाखाली दाबून ब्रिटीशांच्या हरामखोरीचे कारनामे थांबत नव्हते…

    आपल्याच देशात आपलेच भारतीय गुलाम झाले होते आपल्या मातृभूमीला  गुलामीच्या बंदीवासातुन मुक्त करण्यासाठी भारताच्या भूमीत अनेक क्रांतिकारक जन्माला येत होते पण आता ती उपज थांबावी म्हणून ब्रिटिशांनी एक काळा कायदा प्रेरित केला नाव होते रौलट कायदा ( मार्च १९१९)….

    ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?

    या रौलट कायदा विरोधात उठणारी प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ब्रिटिशांनी सर्व दंड भेद वापरले  , विरोधात चलणार्या सत्याग्रही लोकांना कैदेत घातले ,

    ज्याचा निषेध करण्यासाठी लोक जमली त्यावर भडीमार गोळ्या झाडून रक्ताचा सडा  पाडला आणि अमृतसर मध्ये कडक संचारबंदी लागली…

    पर हिंदुस्थानीओ के बुलंद इरादो को कोई रोख सके ऐसी कोई दिवार कहा…?

    आणि मग एक सभा ठरली …एक एक करत कानावर खबर पडत गेल्या तारीख होती १३ एप्रिल १९१९   दिवस बैसाखी चा..

    सुवर्णमंदिरात दर्शन घेऊन लहान मुले, स्त्रिया ,म्हातारी माणसे, तरुण अनेक अनेक आपल्या सणाला साजरी करण्यासाठी जालियनवाला बाग ला जमली होती…

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

               ” जो बोले सो निहाल …. सतश्री अकाल !!” 

    ढोलाच्या तालावर सर्वांच्या जुबानीवर वतन चे तराने होते , ” ऐ वतन तेनु की की मे दे पावा …तु मागे मेनु जान तो युही तैनु दे जावा….!!”

    भारत माता की जय !!

    पण या निष्पाप लोकांना अंदाज सुद्धा नव्हता की पुढे काय होणार होते….

    कळकळ करत अचानक बागचे गेट बंद झाले आणि गोरा ब्रिटीश अधिकारी जनरल डायर सर्वांपुढे सैनिकांना एका रांगेत एक्टिव करून शांत नजरेने आनंद साजरा करणार्यां लोकांना बघत राहिला…

    आणि अचानक त्याच्या कानावर आवाज पडला…  ” वंदे मातरम..!! भारत माता की जय….” 

    आणि डायरचे डोळे विस्फारले , Bloody Indian’s काळे शब्द बाहेर पडले  ” फायर….. !!! 

    आणि धडधड करत गोळ्या चलायला लागल्या देशभक्तांची ह्रदय चिरत , भारत मातेचे जयकार थांबवत , रक्ताचे थारोळे उडवत सुमारे ३९७ लोकांना मारत ,१९२ लोकांना जखमी करत , लहान लहान मुलांचे घास घेत या गोळ्या चालत होत्या

    एक, नव्हे दोन नव्हे तब्बल १६५० गोळ्या झाडल्या गेल्या , १२०  लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहीरीत उड्या घातल्या तीही संपली , ४२ लहान मुले मारली आणि रक्ताने लालबुंद माती करत डायर बाहेर पडला…

    गिधाडांच्या आवाजाने आकाश भरले…

    प्रेत उचलून सुद्धा मातीचा लाल रंगात रंग बदलला …

    रात्री पालटून सर्व शांत झालेल्या त्या बागेत एक लहान मुलगा एकाला स्वतंत्रदेवतेला बसलेला दिसला …आपल्या लहानग्या हाताने तीथली माती पिशवीत भरत होता मग त्याला सहज विचारले…

    ” किसलिये ले जा रहे हो ये मिट्टी…!!”

    ” हमारे लोगो के खुन से.रंगी है ये मिट्टी हमे ये बलिदान याद दिलायेगी…!!”

    नाम क्या है बेटा आपका !!

    चेहऱ्यावर मासुमीयत पण डोळ्यात क्रांतीची छटा उमटलेल्या त्या निरागस ओठातून नवीन अध्याय चे.नाव बाहेर पडले…

    ”  जी मै सरदार भगतसिंग…..!!!”

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    #जिगरे ❤️

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीप्रमाणे ठाकरे कुटुंब चांगलच चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात केलेल्या बंडाने शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली.

    आणि शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मात्र अशामध्ये उध्दव ठाकरेंसोबत सामजिक चळवळीतील अनेक नेते जुडलेत. उध्दव ठाकरे यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मेळावे घेण्यात चांगलेच व्यस्त झाले.

    मात्र शिवसेना पक्षाला अडचणीमधून सांभाळण्यासाठी आता उध्दव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव म्हणजेच तेजस ठाकरे राजकीय क्षेत्रात आपलं पाऊल टाकणार का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    दिनांक ७ ऑगस्टला तेजस ठाकरे यांचा वाढदिवस असतो आणि याच दिवशी ते राजकीय क्षेत्रात सक्रिय होतील. अशी चर्चा सद्ध्या सगळीकडे सुरू आहे.

    तेजस ठाकरे याआधी कधीही कुठल्या राजकिय घडामोडीमध्ये दिसले नाही. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मात्र आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी ते सक्रिय होते. याव्यतिरिक्त त्यानंतर ते कुठल्याही राजकीय घडामोडीमध्ये आढळले नाही.

    एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेमध्ये तेजस ठाकरे यांच कौतुक केलं होतं की,

    ” तेजस ठाकरेंच्या आणि माझ्या स्वःभावामध्ये खूप साम्य आहे.”

    तेव्हापासून ते राजकीय क्षेत्रात चांगलेच चर्चेत आले होते. राजकीय क्षेत्र वगळता ते आपल्या वैयक्तिक जीवनात वन्यप्राण्यांचा प्रजाती शोधून त्यांना वेगवेगळे नाव देण्यात व्यस्त असतात. 

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    व्हीव्हीयन रिचर्ड्सशी तुलना…

    मंडळी आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल की वेस्ट इंडिजचे प्रख्यात क्रिकेटपटू सर व्हीव्हीयन रिचर्ड्स आणि तेजस ठाकरे यांची तुलना कशी काय होऊ शकते?

    तर मंडळी झालं असं की, मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांचा चेहरा वेस्टइंडिजचे क्रिकेटपटू व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्यासारखा दिसत असल्याचं सांगितलं होतं.

    याबद्दल त्यांनी शिवसेनेच्या ‘सामना’ या वृत्तपत्रात तेजस ठाकरे आणि व्हीव्हीयन रिचर्ड्स यांचा फोटो सोबत छापलेला होता.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir