Author: admin

  • देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारण सध्या हे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी उतावीळ झालंय अस म्हणायला काही हरकत नाही. यामध्ये सर्वात आधी नंबर लागतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा.

    मुंबई आणि ठाणेमध्ये घेण्यात आलेल्या त्यांच्या सभांमध्ये शिक्षण , शेती, रोजगार या मुद्द्यांव्यतिरिक्त हनुमान चालीसा , अजाण, हिंदू- मुस्लिम हेच मुद्दे ऐकायला मिळाले. त्यामुळे समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकांना एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होणे साहजिकच आहे.

    राज ठाकरे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र त्यांना राजकीय यश अजूनपर्यंत प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी आता धार्मिक राजकारणाचा सहारा घेतलेला आहे. जे लोकांचे मतं घेण्यासाठी सर्वात उपयुक्त साधन आहे.

    राज ठाकरेंच्या या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय मनसुब्याला आता आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी पाठिंबा दिला आहे. धार्मिक राजकारण खेळून आपण सहज मतं घेऊ शकतो. हे प्रत्येक राजकीय नेत्याला चांगलच माहिती आहे. म्हणून राज ठाकरेंच्या या चालू असलेल्या राजकीय खेळामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनीसुद्धा सहभाग घेतला आहे.

    आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याची ग्वाही दिल्यानंतर अमरावतीमधील शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या घरापुढे आंदोलन केलं. यावर आता नवनीत राणा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. 

    काय म्हणाल्या नवनीत राणा ? 

    शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा यांच्या घरापुढे आंदोलन करतांना पती रवी राणा आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर नवनीत राणा यांनी शिवसेनेला चांगलच प्रतिउत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की,

    ” शिवसैनिकांच माझ्या घरापुढे येऊन आंदोलन करणे ठीक नाही आहे. त्यांनी माझ्याविरोधात मुरदाबादचे नारे लावले. पण धर्म माझ्यासाठी आधी आहे आणि धर्मासाठी जर मला मुरदाबाद म्हटल्या जात असेल, तर मी मुरदाबाद आहे.”

    पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,

    ” उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे. बाळासाहेबांचे विचार आता त्यांच्यात राहलेले नाही. बाळासाहेब ठाकरेंनी केव्हाच कुठल्या पदाची लालसा केली नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी पदासाठी त्यांचे विचार सोडले आहेत. राज ठाकरेंमध्येच बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार दिसून येतात. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर राज ठाकरेंची गरज आहे. आम्ही कुठल्यापण परिस्थितीमध्ये मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार. शिवसैनिकांनी जरी पाय तोडण्याची गोष्ट केली असली तरी आम्ही देवाचं नामस्मरण करत येणार.”

    अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

  • राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे हे त्यांनी तपासून पहावं – जितेंद्र आव्हाड

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली.

    ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम केलं.

    त्यावेळी एकही मुद्दा त्यांनी सामान्य जनतेच्या समस्सेचा घेतला नाही. मात्र काल झालेल्या सभेत बऱ्याच लोकांची अपेक्षा होती की, राज ठाकरे यावेळी तरी रोजगार, शिक्षण, शेती याविषयी बोलतील .

    मात्र राजसाहेब यांनी ते नेहमीचच हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि इतर पक्षावर टीका केली. यासोबतच राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरसुद्धा बोचरी टीका केल्याने आव्हाड यांनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

    आव्हाड यांचं राज ठाकरेंना प्रतिउत्तर

    मंडळी काल ठाण्यात झालेल्या मनसेच्या सभेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोचरी टीका केल्याने आव्हाड आणि राज ठाकरे या दोघांमध्ये चांगलच राजकीय युद्ध रंगल आहे. राज ठाकरे यांनी आव्हाड यांच्यावर टीका करताना म्हटलं की,

    ” जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागसारखा आहे. ये इकडे शेपूट धरून गरगर फिरवतो आणि फेकून देतो.”

    अशी राज ठाकरे यांनी केलेली अपमानजनक टीका ऐकल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा राज ठाकरे यांची प्रतिउत्तर देताना चांगलीच कानउघाडणी केली. आव्हाड म्हणाले की,

    ” राज ठाकरे यांनी आपला चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा हे आरशात तपासून पाहावे. तशा स्टँड अप कॉमेडीयनच्या भरपूर जागा खाली आहेत. त्यांनी त्यामध्ये जावं.”

    अस आव्हाड यांनी म्हटलं आहे. मात्र आता हे रंगलेल राजकीय युद्ध कुठल्या वळणावर जाईल. याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडच ओपन चॅलेंज

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली.

    ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम केलं.

    त्यावेळी एकही मुद्दा त्यांनी सामान्य जनतेच्या समस्सेचा घेतला नाही. मात्र काल झालेल्या सभेत बऱ्याच लोकांची अपेक्षा होती की, राज ठाकरे यावेळी तरी रोजगार, शिक्षण, शेती याविषयी बोलतील .

    मात्र राजसाहेब यांनी ते नेहमीचच हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि इतर पक्षावर टीका केली. बोलत असताना राज ठाकरे यांनी शिवरायांच्या इतिहास बदनाम करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे याचा उदोउदो करत संभाजी ब्रिगेड वर टीका केली.

    मंडळी राज ठाकरेंच्या बोलण्याची लोकांना कीव यावी अशी लहान मुलांसारखी त्यांनी काल वक्तव्य केली. ज्यामुळे राज ठाकरे यांना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात येत आहे. ते म्हणाले की शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची स्थापना १९९९ नंतर केली.

    ज्यामुळे महाराष्ट्रात दंगली वाढल्या. मात्र संभाजी ब्रिगेडची स्थापना मराठा सेवा संघाचे संस्थापक मा. पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० मध्ये केली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडचा उल्लेख बी- ग्रेड असा केल्याने संभाजी ब्रिगेडला ते न पटण्यासारख आहे.

    राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की,

    “संभाजी ब्रिगेडमधील लोकांच वाचन नाही. बाबासाहेब पुरंदरेमुळे शिवराय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले.”

    यावर संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना सडेतोड उत्तर देत जाहीर चर्चेच आव्हान केलं आहे. मात्र राज ठाकरे हे कधीच संभाजी ब्रिगेडच्या अभ्यासकांसोबत चर्चेला येत नाही. हे सुद्धा लोकांना माहिती आहे.

  • एसटी कर्मचाऱ्यांची सदावर्तेकडून फसवणूक

    मंडळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक करून हल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच महाराष्ट्र शासनामध्ये विलीनकरणं व्हावं यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे.

    या आंदोलनामध्ये जवळपास १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही. महाराष्ट्र सरकारचा हा नाकर्तेपणा एसटी कर्मचाऱ्यांच्या सहन करण्याच्या आवाक्याबाहेर गेल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणी न्यायालयाने १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर आला आहे. ही दंगल पेटवण्यामागे मास्टर माईंड सदावर्तेच होते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल एका एसटी कर्मचाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. 

    सदावर्ते आणि गुजर यांनी फसवणूक केली

    मंडळी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे लुटून फसवणूक केल्याचं स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी सांगितलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी सांगितलं की,

    ‘ गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी निलंबित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५४० रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये अशी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम २५० डेपोमधून गोळा केली.”

    अस एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं.सदावर्ते यांची पोलीस प्रशासन चौकशी करत आहे. या प्रकरणाचे धागे दोरे कुठपर्यंत आहे याचीसुद्धा चौकशी पोलीस प्रशासन करत आहे.

  • सार्वकालिक आंबेडकर

    मंडळी या जगामध्ये जगत असतांना काही माणसं असे जगून जातात की समाजामधल्या प्रत्येक माणसाला वाटावं की, जगाव तर अस. असच एक उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मात्र या भारतीय देशाचं दुर्भाग्य अस की या महामानवाला आपण फक्त दलित समाजापर्यंत मर्यादित ठेवलं.

    त्यांनी राज्यघटना लिहिली आणि बौद्ध धम्म स्वीकारून त्यांनी दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला बस एवढंच आपल्याला माहिती आहे. मात्र या समाजमधल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसासाठी झटणारे बाबासाहेब आपल्याला कळलेच नाही.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कामगार नेते होते. स्त्रियांना हिंदू कोडबीलाच्या माध्यमातून पुरुषांइतकाच समान हक्क बहाल करणारे नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. हे कधी आपण वाचलेच नाही. 

    शेतकरी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    मंडळी जेव्हा या देशामध्ये ब्रिटिश सरकारच राज्य होत. तेव्हा त्यांचं म्हणणं होत की, या देशातल्या शेतजमिना ह्या इंग्रज सरकारच्या आहे. त्यावर भारतीय शेतकरी ताबा घेऊन बसलेला आहे. म्हणून इंग्रज सरकार शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करणे, ठराविक कालावधीनंतर तो शेतसारा वाढवणे. अशा अनेक माध्यमातून शेतकऱ्यांच शोषण इंग्रज सरकार करत होत.

    मात्र हे धोरण डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हत. शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे. परिस्थितीने ग्रासलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तो शेतसारा कसा भरेल? शेतकऱ्यांच्या अशा अनेक व्यथा डॉ. आंबेडकरांनी 1८ ऑगस्ट १९२५ रोजी ‘ तरुण भारत ‘ या वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखात मांडल्या आहेत. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी झटणारे महापुरुष म्हणजे डॉ. आंबेडकर आहेत. 

    कामगार नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    मंडळी जेव्हा ब्रिटिशांच राज्य या देशामध्ये होत तेव्हा त्यांनी नवीन उद्योगधंदे सुरू केले. ज्यामुळे स्थानिक जनतेच्या हातामधला रोजगार गेला. उद्योगधंदे बंद पडले. म्हणून ब्रिटिशांकडे काम करत असताना भारतीय मजूरांचे खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सरकार शोषण करत होत.

    हवा तेवढा वेळ काम करून घेणे. सुट्टी न देणे. पगार कापणे किंवा वेळेवर न देणे. अशा अनेक कठीण संघर्षातून कामगार चालला होता. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महापुरुष भारतीय कामगारांसाठी उभा झाला.

    कामगाराच जीवन अनुभवायसाठी डॉ. आंबेडकर बॅरिस्टर असून कोण्या मोठ्या बंगल्यात न राहता कामगार वस्तीमध्ये रहायचे. नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळी उभारून इथल्या प्रत्येक कामगाराला कामाचे तास ठरवून दिले. सुट्टीचा दिवस ठरवून दिला. वेतन योग्य मिळावे यासाठी तरतूद केली.

    महिलांनासुद्धा पुरुषांसोबत समान वेतन मिळेल याची तरतूद केली. प्रत्येक स्त्रीला प्रसूतीच्या आधी १० आठवडे आणि प्रसूतीच्या नंतर ४ आठवडे सुट्टी घेण्याची तरतूद केली आणि गुलाम, शोषित झालेला इथला मजूर मजबूत करण्याचं कामसुद्धा डॉ. आंबेडकर यांनी केलं. 

    मंडळी अशी अनेक महान कार्य डॉ. आंबेडकर यांनी इथली प्रत्येक समाजासाठी केली आहे.

  • १०९ एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

    मंडळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक करून हल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच महाराष्ट्र शासनामध्ये विलीनकरणं व्हावं यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे.

    या आंदोलनामध्ये जवळपास १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी महाराष्ट्र सरकारला जाग आलेली नाही. महाराष्ट्र सरकारचा हा नाकर्तेपणा एसटी कर्मचाऱ्यांच्या सहन करण्याच्या आवाक्याबाहेर गेल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली.

    या प्रकरणी न्यायालयाने १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी अन्य कर्मचाऱ्यांची धरपकडही केली आहे. आता मात्र एसटी महामंडळाने सम्पूर्ण कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.

    कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करू त्यांना कोठडीमध्ये डांबने हे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न आता सम्पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. ज्याप्रमाणें केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे जीव गेले त्यापेक्षा ही परिस्थिती काही वेगळी नाही आहे. 

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं की,

    ” एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला गुन्हा हा गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. एसटी महामंडळाकडूनही एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.”

    अस त्यांनी सांगितलं. मात्र १२० कर्मचाऱ्यांचा जीव गेला यावर कोण कारवाई करणार ? हा सुद्धा प्रश्न अनिल परब यांना पडणे महत्वाचं आहे.

  • अकोल्यात अमोल मिटकरींच आंदोलन

    मंडळी महाराष्ट्रातल्या राजकारण तापण्याचा वेग आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिल्याचा वाद मिटलाच नाही, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक नावाच्या ठिकाणी हल्ला केल्याने राजकीय वातावरण आणखीच चिघळल आहे.

    गेल्या कित्येक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीयकरणासाठी आंदोलन चालू आहे. जवळपास १२० एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आत्महत्या केल्या. मात्र राज्यसरकारला अध्यपही जाग आलेली नाही. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक नावाच्या घरावर दगड फेक करत आंदोलन केल.

    मात्र या हल्ल्यामागचा मास्टर माईंड कोण आहे. याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेचा निषेध करत अकोल्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केल आहे. 

    काय म्हणाले अमोल मिटकरी ?

    एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर केलेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड भाजप आहे. असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भाजपने भडकवण्याचं काम केलं आहे. असा पण त्यांनी आरोप केला आहे.

    याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलेली आहे. मात्र या सर्व घटनेमागचा मास्टर माईंड कोण? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.

  • कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट आणण्यासाठी
    चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टोलेबाजी

    मंडळी सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत चिघळत चाललं आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार म्हणजे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध सद्धया महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

    कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची डबल ढोलकी असते, अस ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर बोलताना कोल्हापूर निवडणूकीच्या अनुषंगाने खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.

    ते म्हणाले,

    “तुम्ही कोल्हापूर शहरात आला तर विकास निधी वाढेल. त्याचा गावांच्या विकासासाठी फायदा होईल. अस आम्ही गेल्या पाच वर्षात इथल्या गावांना सांगितलं परंतु या गावांनी ऐकलं नाही.”

    अस ते म्हणाले. 

    चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले की,

    ” जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी असते. जिल्हा परिषदेची निवडणूक आली शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्दवाढीची मागणी करतात.”

    अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मात्र आता यावर महाविकास आघाडीमधील नेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • वसंत मोरे यांनी मला रिकामटेकड म्हणलं होत – रुपाली ठोंबरे

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मस्जिदींपुढे भोंग्यात हनुमान चालीसा लावण्याचा आदेश वसंत मोरे यांनी नाकारला.

    या गोष्टीचा राग मनात धरुन राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून काढले आहे. मात्र यानंतर वसंत मोरे यांना इतर पक्षांमधून पक्ष प्रवेशाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. मात्र त्यांनी अद्याप कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे.

    वसंत मोरे यांनी आपलं मत व्यक्त करतांना म्हटलं की,

    ” माझ्या कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असण्याच्या आधी एका प्रभागाचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या प्रभागमध्ये सर्व धर्मीय सर्व जातीचे लोक राहतात. मी एकमेव नगरसेवक असा आहे की ज्याच्या प्रभागामध्ये सर्व धर्मीय स्मशानभूमी आहे. त्यामुळे मला राज ठाकरे साहेबांचा हा निर्णय नाकारावा लागला.”

    अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

    वसंत मोरेंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे – रुपाली ठोंबरे 

    वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

    त्या म्हणाल्या की,

    ” जेव्हा मी मनसे पक्ष सोडला होता तेव्हा वसंत मोरे यांनी म्हटलं होतं की मी राजकीय आत्महत्या केली आहे. मात्र आता वसंत मोरे यांनी राजकीय हत्या झाली की आत्महत्या ? हा प्रश्न त्यांना पडायला हवा. वसंत मोरे एक चांगले प्रतिनिधी आहे. त्यांच्या प्रभागामध्ये सर्व धर्मीय लोक राहतात. म्हणून त्यांना  राज ठाकरेंचा आदेश नाकाराव लागला. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत आहे.”

    अस रुपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितल.

  • संजय राऊत यांना गेट वेल सूनच सांगावं लागेल – प्रसाद लाड

    मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या संजय राऊत यांनी ईडीने मालमत्ता जप्त केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलच चिघळत जात आहे. मात्र सम्पूर्ण महाराष्ट्रात सद्ध्या सुडाच राजकारण सुरू आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. केंद्र सरकार राज्य सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहेत, तर दुसरीकडे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादण्याचा प्रयत्न करत आहे.

    मात्र जनतेच्या प्रश्नाचं कुणाला काही एक पडलं नाही. महाराष्ट्रामध्ये रोजच्या तारखेला कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. रोजगाराचा प्रश्न सम्पूर्ण महाराष्ट्रात वाढत चालला आहे. पेट्रोल , डिझेलचे भाव वाढत जात आहे. मात्र यावर बोलायला कुणीच तयार नाही.

    फक्त एकमेकांवर आरोप करायचे आणि एकमेकांना अटक होईपर्यंत पर्यंत राजकारण करायचं बस एवढंच. संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात आरोप केल्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

    काय म्हणाले प्रसाद लाड? 

    संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या चौकशीनंतर त्यांच्या पारा ठिकाणावर न राहल्या कारणाने राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात आरोप केले होते. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी राऊत यांना प्रतिउत्तर देतांना चांगलच सुनावलं आहे.

    ते म्हणाले की,

    ” संजय राऊत यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सूनच सांगावं लागेल. ज्या प्रकारे राऊत आरोप करत आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. किरीट सोमय्यांनीही सांगितलंय की मुझ्यामंत्र्यांना कागदपत्रे देऊन माझ्यावर कारवाई करा. त्यामुळे राऊत आणि गॅंग किरीट सोमय्या यांना फसवण्याच्या प्रयत्न कर आहेत. पण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.”

    अस ते म्हणाले.